Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अक्कलकुवा येथील अतिक्रमण वाद न्यायालयात - ग्रामविकास अधिकारी यांना न्यायालयाची नोटीस

अक्कलकुवा येथील अतिक्रमण वाद न्यायालयात – ग्रामविकास अधिकारी यांना न्यायालयाची नोटीस

 अक्कलकुवा – ( प्रतिनिधी )अक्कलकुवा ग्रामपंचायत मार्फत करण्यात येत असलेल्या    एकतर्फा अतिक्रमण हटावची कार्यवाही  तक्रारदार यांच्या कायदेशीर हक्क व अधिकाराचे हनन करणारी  असल्याने  कायदेशीर तरतुदीनुसार अतिक्रमणधारक यांस ३० दिवसाची मुदत देणे आवश्यक असतांना तक्रारदार यांना    केवळ १५ दिवसाची मुदत दिली होती.   ग्रामपंचायत मार्फत बजावणी करण्यात आलेली   नोटीस  तक्रारदार  यांना प्रत्यक्ष न देता मागील तारीख नमूद करून योग्य मार्गाने नोटीसची बजावणी केलेली नाही. याशिवाय    प्राथमिक स्तरावर अंतर्गत चौकशी करणे गरजेचे असतांना वस्तुस्थितीची पडताळणी न करता नोटीस दिली  होती.  त्यामुळे तक्रारदार   यांना बचावाची संधी तसेच  तक्रारदार  यांची  बाजू मांडण्याची संधी न देता अक्कलकुवा ग्रामपंचायत मार्फत काही दुकानांवर बेकायदेशीररित्या कारवाई करण्यात येत असल्याने तक्रारदार श्री.तिज्या दिवाल्या वसावे  यांनी ॲड.रुपसिंग वसावे यांचेमार्फत अक्कलकुवा येथील म.दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला असून म.न्यायालयाने ग्रामपंचायतीस कारणे दाखवा नोटीस बजावली असून  दिनांक १४/०६/२०२३ रोजी पर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे.