धानोरा गावातील ८० ते ९० विद्यार्थी हे माध्यमिक विद्यालय आमलाड येथे शिक्षणासाठी रोज ये जा करीत असतात हे विद्यार्थी चार की.मी.पायी, सायकल व मोटर सायकलनी प्रवास करीत होते. तर काहींना नाइलाजास्तव शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करत त्रास सहन करून शिक्षणासाठी आमलाड येथे यावे लागत होते. यासाठी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेशदादा पाडवी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन व्ही मराठे यांच्यासह शिक्षक रघुवीर कुवर, ज्ञानेश्वर गिरासे, भुवनेश भामरे, सुशील सूर्यवंशी व पालकांनी अक्कलकुवा आगार प्रमुख रविंद्र मोरे, भावेश गोस्वामी यांच्याकडे तळोदा ते धानोरा बस सुरू व्हावी याची वेळोवेळी मागणी केली होती ती मागणी त्यांनी मान्य करून आज या बस चा शुभारंभ गावाचे माजी सरपंच जगलसिंग ठाकरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक मराठे, जि प शाळा धानोरा मुख्याध्यापक अमोल सुर्यवंशी यांच्या शुभ हस्ते बस ची पूजा करून श्रीफळ फोडून करण्यात आले. तसेच चालक रामकृष्ण जावरे व वाहक आर.व्ही.गायकवाड यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ही बस गावात आल्याने विद्यार्थी व पालक व ग्रामस्थांनी स्वागत केले यावेळी क्रीडा शिक्षक पुलायन जाधव, गावातील रणजित ठाकरे, धर्मा भिलावे, तारसिंग भिलावे, बापू पाटील, मोहन पाटील, संजय पाटील व विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
धानोरा येथे परिवहन महामंडळाची बस सूरू झाल्याने विद्यार्थी आनंदीत, ग्रामस्थानी चालक वाहकाचा सत्कार केला
June 20, 2023
तळोदा दि २०( प्रतिनिधी). धानोरा ता तळोदा येथे बऱ्याच वर्षा नंतर पुन्हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस सुरू केल्याने विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांची प्रवासाची सोय झाल्याने आनंद व्यक्त केला आहे.