महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (दि.२) जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. तसेच सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर नागपूरचा सर्वात कमी लागला आहे. कोकणचा निकाल हा ९८.११ लागला आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा दहावीचा निकाल तीन टक्क्यांनी घसरला आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णाचे प्रमाण ३.८२ टक्क्यांनी जास्त आहे.गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जूनच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. दहावीच्या मार्च - एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत. दहावी(SSC)ची परीक्षेच्या निकाल उद्या (दि.२) जाहीर झाला आहे.(SSC)
विभागीय निकाल
पुणे: 95.64 टक्के
नागपूर: ९२.०५ टक्के
औरंगाबाद: ९३.२३ टक्के
मुंबई: ९३.६६ टक्के
कोल्हापूर: ९६.७३ टक्के
अमरावती: ९३.२२ टक्के
नाशिक: ९२.२२ टक्के
लातूर: ९२.६७ टक्के
कोकण: ९८.११ टक्के