तळोदा दि ७(ता प्र) तळोदा येथील मोती बँकेच्या रौप्य महोत्सव निमित्त सभासदांना बँकेचे अध्यक्ष निखीलभाई तुरखीया यांच्या हस्ते भेटवस्तूचे वाटप करण्यात आले
तळोदा येथील अग्रगण्य बँक म्हणून मोती बँकेचे नाव लौकिक आहे बँकेने आपल्या रौप्य महोत्सव निमित्त धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 5 शाखेतील सभासदांना भेटवस्तू वाटप केले.
बँकेमार्फत सभासदांना गृहोपयोगी वस्तूचे वाटप करत असते याआधी देखील बँकेमार्फत पाण्याचे जार बॅग कास्याची थाळी तवा चांदीचे शिक्के इ वस्तूचे वाटप केले आहे. सभासदांचा व ठेवीदारांचा बँकेवर विश्वास असल्यामुळेच हे शक्य झाले असे बँक अध्यक्ष निखीलभाई यांनी सांगितले.
बँकेच्या शाखेतील भेटवस्तू घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार सभासदांनी आपले के वाय सी अद्ययावत करणे आवश्यक आहे त्यासाठी सभासदांनी आपले आधारकार्ड व पॅन कार्ड चे झेरॉक्स ई-मेल पत्ता मोबाईल नंबर इत्यादी माहिती बँकेला पुरवावी के वाय सी अद्ययावत करून भेटवस्तू बँकेकडून घ्यावी असे आवाहन बँकेतर्फे करण्यात येत आहे.
कार्यक्रम प्रसंगी जनरल मॅनेजर गणेश पाटील शाखाधिकारी वसंत पाटील भूषण चौधरी प्रशांत शिंपी रमेश पाटील आसिफ पिंजारी गणेश शिंपी अमर पाटील आदी उपस्थित होते.