Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अफार्म संस्था तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, पर्यावरण संवर्धन संकल्प, वृक्षारोपण, करून साजरा करण्यात आला.


अफार्म संस्था तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, पर्यावरण संवर्धन संकल्प, वृक्षारोपण, करून साजरा करण्यात आला.
नंदूरबार दि ५(प्रतिनिधी) मौजे कळंबा ता.जि. नंदुरबार येथे अफार्म (एकशन फॉर अग्रीकल्टर रिलेविंग इन महाराष्ट्रा) पुणे संस्थे मार्फत जागतिक पर्यावरण दिन निमित्त एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प नंदुरबार तर्फे गावात ग्रामस्था सोबत जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
        ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच  भरत बागुल यांचे अध्यक्षतेखाली सर्व ग्रामस्थांचा उपस्थितीत प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व, गरज आणि पर्यावरण संवर्धन या बाबत अफार्म संस्थेचे कर्मचारी प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप साळवे, कृषी विस्तार अधिकारी रोहित लोहार, पशुधन विकास अधिकारी गजानन खीरोडकर, समुदाय संघटक मनोहर बोसले यांनी मार्गदर्शन केले. जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या अनुषंगाने गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण ककरण्यात आले, त्या मध्ये स्थानिक प्रजातीच्या वन वृक्षाची रोपे वड, पिंपळ, लिंब, चिंच आणि पळस इत्यादीचे वृक्षारोपण करण्यात आले. नंतर गावामध्ये जनजागृती फेरी काढून नैसर्गिक साधन संपत्तीचे सवर्धन करणे बाबत  ग्रामस्थांनी एकत्रीत रित्या संकल्प घेण्यात आला.