Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा व्यापारी असोसिएशन व पोलीस प्रशासनात शहरात सीसीटीव्ही कॅमेरे संदर्भात संयूक्त बैठक संपन्न

तळोदा दि ५ (प्रतिनिधी) तळोदा पोलीस स्टेशन व व्यापारी महासंघ यांची संयुक्त बैठक शहरात सीसीटीव्ही कॅमेरे संदर्भात झाली.
              यावेळी नूकतेच प्रभारी पोलिस निरीक्षक भदाणे उपस्थित होते.शहरात चोरी,चैन स्नेचिंग,मूलींची छेड असे बरेच प्रकरणे घडल्याने गेल्यावर्षी व्यापारी असोसिएशनने पोलिसांत अर्ज देऊन शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती.याबाबत अधिकारी,पूढारी,यांनी शहराचा सर्व्हे करत,वरीष्ठ स्तरावर निधिची मागणी, सर्व्हे आणि निधीबाबत वृत्तपत्रातमध्ये फोटो, बातम्यतून प्रसिद्धी मिळवली मात्र वर्षं उलटून ही निधी आलाच नाही आणि कॅमेरे हवेतच विरले,वर्षभरानंतर तो विषय पून्हा सूरु झाला असून बैठक आयोजित करण्यात आली होती. यांत पोलीस प्रशासन ने व्यापारींना आव्हान केले की, प्रत्येक व्यापारी बंधूनी शक्य असल्यास एक कॅमेरा रोड साईड फेसिंग करण्याची विनंती केली. व्यापारी महासंघ ने होकार देत शक्य तेवढे व्यापारी रोड फेसिंग कॅमेरा लावतील अशी ग्वाही दिली.मात्र काही घटना घडल्यास व्यापा-यांना सीसीटीव्ही फूटेजसाठी त्रास देऊ नये,गि-हाईकीत येऊ नये,अशी अट ठेवली आहे.या चर्चा दरम्यान व्यापारी महसंघ ने एक वर्षापूर्वी केलेल्या सीसीटीव्ही ची मागणी अजून अपूर्ण आहे त्याबद्दल शासन व प्रश्नासनावर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पोलीस प्रशासन व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार,उपाध्यक्ष अमित ठक्कर, निखिल तुरखीया, सुभाष चोपडा, शाम राजपूत,प्रसाद सराफ, गौतम जैन, सचिव मनोज भामरे,मुकेश जैन, मुकेश वाणी ,खेताराम पटेल, चेतन शर्मा,राजेंद्र जैन,युसूफ बोहरी, राजेश चौधरी हितेश सोनार राहुल सोनार आश्विन सोनार तुषार सोनार आदी व्यापारी उपस्थित होते.