अक्कलकुवा दि ५(प्रतिनिधी) कौशल्य रोजगार, उद्योजक व नाविन्यता विभाग महाराष्ट्र यांच्यावतीने अक्कलकुवा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी युवाशक्ती करिअर शिबिर घेण्यात आला.
या शिबिराला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रियाताई गावित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
विद्यार्थी दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक मार्ग आहेत. मात्र योग्य करिअरची निवड केल्याने भविष्यात त्यांना नोकरीसाठी मोठी संधी निर्माण होईल असेच निवडा त्याचसोबत पगार देखील चांगला मिळेल, यासाठी आधुनिक करिअर निवडणे गरजेचे आहे.
युवाशक्ती करिअर शिबिरात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रियाताई गावित, सरपंच उषाताई बोरा, पंचायत समिती सभापती नानसिंग वळवी, प्राचार्य आर.पी.नाईकनवरे, प्राचार्य एम बी ढोलार, त्यासोबत प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.