Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारत - अमेरिका नवा अध्याय, दोन्ही देशात आठ नवीन करार

सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि २३
           पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा भारतासाठी सर्वदृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरला आहे. या दौऱ्याने( India-U.S.)भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होण्यासोबतच महत्त्वाचे व्यापारी करार झाले. व्हाईट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात झालेल्या बैठकीत एकामागोमाग आठ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात सेमीकंडक्टर, रेल्वे, तंत्रज्ञान, ड्रोन, जेट इंजिन आणि अंतराळ क्षेत्रांतील सहकार्य करारांचा समावेश आहो. यानंतर पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील दिग्गज कंपन्यांच्या सीईओंची भेट घेऊन भारतात गुंतवणुकीसाठी सादर आमंत्रित केले.
               पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यातील परस्पर चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान महत्त्वाचे आठ करार झाले आहेत. हे सर्व करार भारत आणि अमेरिकेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या करारांमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी उंची मिळणार आहे तसेच विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या अध्यायाला प्रारंभ होणार आहे.
*अमेरिकी सेमीकंडक्टर कंपनी मायक्रॉन गुजरातमध्ये आपला प्रकल्प उभारणार असून, त्यासाठी कंपनी 2.7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.
*भारतीय रेल्वेने अमेरिकी एजन्सी यूएसएआयईडीसोबत करार केला आहे. क्लीन एनर्जी आणि ऊर्जा दक्षता मुद्यांवर दोन्ही देश सहकार्य करणार आहेत.
*नासा आणि इस्रो 2024 मध्ये संयुक्त अंतराळ मिशन राबवणार आहे. यापुढे दोन्ही देश एकमेकांना अंतराळ क्षेत्रात सहकार्य करणार आहेत.
*भारतात जीई एयरोस्पेस कंपनीच्या इंजिनचे उत्पादन केले जाणार आहे. त्यानंतर फायटर जेट्सचे इंजिन भारतातच तयार होतील.
*दोन्ही देश मिळून डिफेन्स एक्सलेरेशन इकोसिस्टम
सुरू करणार आहेत. त्यात दोन्ही देशांची विद्यापीठे,स्टार्टअप्स, उद्योगधंदे आणि थिंक टँक्स सहभागी होतील. एकमेकांचे तंत्रज्ञान, माहिती, उद्योग, उत्पादन यांची याद्वारे परस्पर देवाणघेवाण होणार आहे.
*दोन्ही देशांनी गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि परस्परांसोबत त्याची देवघेव करण्याचाही करार केला आहे.
*भारत-अमेरिका India - U.S. जनरल अॅटोमिक्स एमक्यू-9 रीपर सशस्त्र ड्रोन खरेदीबाबत सहमत झाले आहेत. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे ड्रोन अतिशय महत्त्वाचे आहे. याद्वारे सागरी तसेच अन्य आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित होणार आहेत. 29 हजार कोटींमध्ये भारताला 30 लढावू ड्रोन मिळणार आहेत.
*अमेरिका भारतात दिल्लीव्यतिरिक्त बंगळुरू आणि अहमदाबाद येथेही दूतावास सुरू करणार आहे. याशिवाय भारतही अमेरिकेत अतिरिक्त दूतावास सुरू करणार आहे. याद्वारे व्हिसा प्रकि'या अधिक सुकर होणार आहे.