Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात दलित आदिवासी यांच्यावरील हल्ल्याच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळोदा कडून जाहीर निषेध

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात दलित आदिवासी यांच्यावरील हल्ल्याच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळोदा कडून जाहीर निषेध

तळोदा दि.१२ (प्रतिनिधी)
एकापाठोपाठ एक दलित बांधवांच्या महाराष्ट्रभर अमानुषपणे हत्या होत आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर जाहीर निषेध, निवेदने, मोर्चे काढण्यात येत आहेत. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात दलित आदिवासी बंधू-भगिनींवर हल्ले करुन त्यांची हत्या करण्यात येत आहे.
       रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळोदा तालुक्याच्या वतीने तहसीलदार तळोदा यांना आज दिनांक 12 जून रोजी निवेदन देऊन होणाऱ्या घटनांच्या जाहीर निषेध करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र मध्ये त्याच महापुरुषांची जयंती साजरा केली म्हणून एका युवकाचा खून केला जातो. नांदेड जिल्ह्यातील बोंडार या गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या तरुणाला जातीवाद करून खून केला जातो.तसेच रेणापूर येथील मातंग समाजातील गिरधारी तपघाले यांची सुद्धा हत्या करण्यात आली. हीच आहे का महाराष्ट्राची ओळख?सगळी वैचारिकता विसरून माणसा माणसांमध्ये विष पेरणे एवढे काम आता उरले आहे का? यातील आरोपींना भर चौकात फाशी झाली पाहिजे. अशी मागणी या निवेदनामार्फत रिपब्लिकन पार्टी ऑफ पाठवले गट करीत आहे.
           एक तरुणी मनात काहीतरी स्वप्न घेऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला येत शिक्षण पूर्ण करून एक दोन दिवसांनी घरी परतायची वेळ अशावेळी सुरक्षारक्षकाने ती एकटी आहे याची त्याला कल्पना असते आणि रात्री तिच्या खोलीत शिरून तिच्यावर बलात्कार करून तिला जेव्हा ठार मारतात तिचा खून करतो. एवढ्या निंदनीय प्रकार राज्याच्या राजधानी असलेल्या मुंबई शहरात होतो व मुख्यमंत्री गृहमंत्री राहत असलेल्या शहरात होतो. या घटनेच्या सुद्धा जाहीर निषेध आम्ही नोंदवित आहोत.तसेच होस्टेलचे कर्मचारी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना त्वरित निलंबित केले पाहिजे.अशी मागणी या निवेदना मार्फत राज्य शासनाकडे व गृह खात्याकडे करीत आहोत संबंधित आरोपीला कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यामार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही या निवेदना मार्फत देत आहोत.
           निवेदनावर भिकलाल ढोडरे तालुका अध्यक्ष आरपीआय, संतोष ढोडरे ग्रामपंचायत सदस्य बोरद,कन्यालाल ढोडरे,सूर्या सामूद्रे तालुका उपाध्यक्ष, शरद  सोनवणे, सिद्धार्थ ढोडरे, नितीन गरुड परिवर्तन युवा मंच, सिद्धार्थ नरभवर परिवर्तन युवा मंच, रामदास भामरे, रवींद्र ढोडरे, संतोष ढोडरे,बाबुराव बिरारे, जमील शेख सरपू, संतोष पिंपळे, ठाकरे महेंद्र, चंद्रकांत पाटील, मंगलसिंग चव्हाण माकप, दयानंद चव्हाण बिरसा फायटर्स  आदी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.