झाड कोसळून मृत्यू झालेल्या राजेंद्र मराठे यांच्या कुटुंबाला आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते चार लाखाचा धनादेश
तळोदा दि ५(प्रतिनिधी)तालुक्यातील चक्रीवादळात चिनोदा गावाजवळ वडाचे झाड कोसळून कारचालक राजेंद्र मराठे रा. प्रतापपुर याचा जागीच मृत्यू झाला होता.त्यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून तात्काळ मदत करण्यात आली असून चार लाखाच्या धनादेश सुपूर्द करण्यात आला.
रविवार दि ४ रोजी चिनोदा ता तळोदा गावानजीक रस्त्यावर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळून प्रतापपुर येथिल राजेंद्र रोहीदास मराठे (४८) यांचा झाडाखाली दबून मृत्यू झाला होता. राजेंद्र मराठे हे घरात कमावते एकटे असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे मराठे परिवाराच्या संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी प्रशासना विरोधात रोष व्यक्त करत त्यांच्या मृतदेह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आणण्यात आला होता.घटनेस कारणीभूत अधिकारींवर सदोष मनूष्यवधाचा गून्हा दाखल करण्यासाठी ठिय्या धरण्यात आला होता.उपस्थीत अधिकारींनी योग्य ती कारवाई करण्याच आश्वासन दिले होते.
याप्रसंगी आमदार राजेश पाडवी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शशिकांत वाणी, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, तहसीलदार गिरीश वखरे यांनी शासकीय नियमानुसार मयत राजेंद्र मराठे परिवाराला तात्काळ मदत केली जाईल,असे नातेवाईकांना व ग्रामस्थांना आश्वासित केले होते.त्यानुसार तहसीलदार गिरीश वखारे यांनी तात्काळ कारवाई करत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून मराठे कुटुंबीयांना चार लाखाच्या निधी मंजूर केला.
सोमवार दि ५ रोजी सायंकाळच्या सुमारास आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते मराठे परिवाराला चार लाखाचा धनादेश देण्यात करण्यात आला. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे,प्रभाकर उगले, पंकज पावरा आदीसह प्रतापपूर ग्रामस्थ उपस्थित होते.