Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अक्कलकुवा येथे "आमदारांची वारी, आपल्या दारी"कार्यक्रम संपन्न

अक्कलकुवा दि ९(प्रतिनिधी)
   तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसह विविध विभागांमार्फत  पावसाळा तोंडावर येऊनही अपेक्षित रोजगार उपलब्ध करून न दिल्याने आमदार आमश्या पाडवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रोजगारासाठी होणारे आदिवासी मजुरांचे स्थलांतर व त्यातून होणारी पिळवणूक कधी थांबेल, असा प्रश्न अधिका-या समक्ष उपस्थित केला. जे अधिकारी काम करत नाही, त्यांना सोडणार नाही, असा खूला दम देत, मी शांत बसणारा, आराम करणारा पुढारी नाही. मला काम पाहिजे. जे अधिकारी काम करणार नाहीत, त्यांची रितसर तक्रार करून त्यांना घरी पाठवेल. असा इशारा त्यांनी मेळाव्यात दिला.
            नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार आमश्‍या पाडवी यांनी ‘आमदारांची वारी, आपल्‍या दारी’  उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतंर्गत अक्‍कलकुवा तालुक्‍यात झालेल्‍या जनता दरबारात नागरीकांनी आमदारांपुढे आपल्‍या समस्‍यांचा पाढा वाचला.आमदार आमश्या पाडवी यांनी त्यांच्या संकल्पनेतून सामान्य जनतेच्या विविध समस्या तात्काळ सोडविण्यासाठी नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने या आधी धडगाव येथे जनता दरबार झाला.आता अक्कलकुवा तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांच्याकडुन वर्षभराच्या कामाचा आढावा सादर करण्यात आला.
         जनता दरबारात आलेल्या सामान्य नागरिकांच्या विविध समस्या आणि त्यांचे म्हणणे ऐकुन जागेवर त्यांच्या समस्या व प्रश्न देखील सोडविण्यात आले. त्यामुळे अनेक महिन्यांपासुन आपल्या कामासाठी विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.