Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या वाढ दिवसनिमित्त जवाहर मेडीकल फाऊंडेशन धूळे येथे विविध उप्रकमांचे आयोजन.

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसाला
जवाहर मेडीकल फाऊंडेशनमध्ये विविध उप्रकम.
 
 धुळे दि १४(प्रतिनिधी- सतिष पवार ) महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने जवाहर मेडीकल फाऊंडेशनचे आण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात रक्तदान,फळ वाटपासह विविध उपक्रम राबविण्यात आले.माजी मंत्री व अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक खान्देश नेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळे तालुक्यासह जिल्हयात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाचे औचित्य साधुन जवाहर मेडीकल फऊंडेशनच्या रुग्णालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले.येथील शिवभोजन केंद्रात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिष्ठान्नाचे वाटत मेडीकल फाऊंडेशनच्या सचिव डॉ.ममताताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रुग्णालयातील विविध विभागात उपचार घेतल असलेल्या दाखल रुग्णांना फळवाटपही झाले. त्याचप्रमाणे क्षयरोग विभागातील रुग्णांना प्रोटीनयुक्त शिधा देण्यात आला. दरम्यान रुग्णालयातील कर्मचारी विवेक रवंदळे आणि राकेश काकुस्ते यांनी माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमत्ताने रक्तदान केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव डॉ.ममताताई पाटील,डॉ.शैलेंद्र पाटील, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, सैताळे उपसरपंच सुनिल पाटील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, गोलू पाटील,डॉ.प्रशांत सोलंके अधिष्ठाता, डॉ.आर.व्ही.पाटील, डॉ.द्रविड, डॉ.आर.टी.कर्णिक,डॉ.मधुकर पवार,डॉ.तृप्ती अग्रवाल,डॉ.शिवधन गोंदकरडॉ. गणेश कुलकर्णी, अश्विन पंचभाई,रवि पाटील,यशवंत पाटील,निलेश पाटील, झामभाऊ पाटील, बापू पाटील, दादाभाई पाटील,चंदू पाटील, निंबा मराठे,विवेक रवंदळे,राकेश काकुस्ते, गोकुळ ठाकूर,राहूल कचवे,समाधान पाटील आदी उपस्थित होते.