Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नव्याने 
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

नंदुरबार,दिनांक.13 जून ,2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी 2023 ते डिसेंबर,2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच सन 2022 मध्ये  चुकीची प्रभाग रचना, आरक्षण झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन) गोविंद दाणेज यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे......

शुक्रवार, 16 जून 2023 रोजी आरक्षण काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येईल. बुधवार, 21 जून, 2023 रोजी विशेष ग्रामसभा बोलवून आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. शुक्रवार, 23 जून, 2023 रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला (नमुना ब ) जिल्हाधिकारी मान्यता देतील. 
                   सोमवार, 26 जून, 2023 रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. मंगळवार, 27 जून 2023 ते सोमवार, 3 जुलै,2023 या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील. शुक्रवार, 7 जुलै,2023 रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देण्यात येईल. 
          बुधवार, 12 जुलै,2023 रोजी अंतिम अधिसूचनेस (नमुना अ ) जिल्हाधिकारी मान्यता देतील. तर शुक्रवार, 14 जुलै,2023 रोजी अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्ध देण्यात येईल. असे उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) श्री.दाणेज यांनी कळविले आहे.