मौजे पाचनवडगाव भिमनगर येथे, शौर्य बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने बेरोजगार तरुणांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण साळवे हे होते.
सूरूवातीला मेळाव्याचे उद्घाटन प्रमुख मार्गदर्शक ,समाज सेविका, पुरोगामी प्रत्रका संघ आणि अन्याय अत्याच्यार निवारण समिती मराठवाडा विभागीय अध्यक्ष औरंगाबाद विशाखा समिती सदस्य, लोहमार्ग शकिला पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक संविधान प्रचारक चंद्रमणी गाठेकर बहुजन रिप्लीकन सोसलिस्ट पार्टी जालना जिल्हाध्यक्ष मिलिंद बोर्डे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात तरुणांसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, रोजगार केंद्र, लघू उद्योग यांत शासनाचा योजना व अनूदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.