मराठा महासंघाचा वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त निमित्ताने पूजन
चाळीसगाव दि ७( प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चाळीसगाव येथील शिवाजी घाट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण अखिल भारतीय महासंघाच्या वतीने करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक 6जून2023 रोजी सायंकाळी 7 वाजता अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने चाळीसगाव येथील शिवाजी घाट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे पूजन मराठा महासंघाचे वतीने करण्यात आले. *सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकिशोर पाटील व मराठा महासंघाचे चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे (पत्रकार )यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले*. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे पूजन करून जय जयकार केला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ चे *चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे, अशोक भोसले साहेब, शिवसेनेचे सुनील (भावडू) गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर पाटील, मराठा महासंघाचे चाळीसगाव शहर संघटक मोतीराम मांडोळे, सदस्य राजू पाटील, आबा पाटील, पत्रकार घनश्याम सोनार, एडवोकेट दीपक वाघ* आधी समाज बांधव उपस्थित होते.