Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नर्मदा माता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व कृषी विज्ञान केंद्र यांच्या विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण व दूध उत्पादक आणि शेळी पालन आणि कुक्कुट पालन कार्यक्रम संपन्न

तळोदा दि १७(प्रतिनिधी)
नर्मदा माता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गंगानगर त-हावद पुनर्वसन येथे कृषी विज्ञान केंद्र कोळदा नंदूरबार यांच्या विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण व दूध उत्पादक आणि शेळी पालन आणि कुक्कुट पालन बाबत कार्यक्रम संपन्न झाला.
         कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे होते.प्रमुख अतिथी डॉक्टर पशुवैद्यकीय घोडा गणापुरे सर व आरती देशमुख मॅडम उपस्थित होते.

शेती व शेतकरी समृध्द होण्याचा मार्ग हा शेतीपूरक व्यवसायात दडलेला आहे. तो भक्कम होण्यासाठी कृषीपुरक चळवळीची  महत्वपूर्ण जोड देवून  शेती व शेतकऱ्यांना एक समृध्द मार्ग अवलंबता येतो. कृषीपुरक उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागाची पायाभरणी करत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
          कृषीपुरक उद्योग चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडू शकतो यावर मार्गदर्शन करण्यात आले.ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या विकासासाठी आजही कृषीपुरक उद्योग चळवळीची गरज असल्याची चर्चा करण्यात आली.
          आयोजक दिलवरसिंग पाडवी सरपंच त-हावद पुनर्वसन, धिरसिंग पाडवी रमेश पाडवी, रुमा वळवी ,भामटा पाडवी, रायसा  वळवी, सजना पाडवी, रायसिंग वसावे, अजिला पाडवी, बुथरीबाई पाडवी  आदींसह महीला व पुरुष उपस्थित होते.