कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि तळोदा येथील वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व परीक्षा विभागा मार्फत विद्यापीठाच्या आदेशान्वये विद्यार्थ्यांसाठी परीक्षा या तान-तणावमुक्त व कॉपीमुक्त व्हाव्या याकरिता अभिनव उपक्रम राबविण्यात आला व विद्यार्थ्यांना त्यातून मार्गदर्शन केले जात आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिस्त व कॉफीमुक्त ताणतराव मुक्त परीक्षा देता येईल याकरिता महाविद्यालयातील परीक्षा विभागामार्फत मोलाचे असे मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस. बी. गरुड यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सुरुवातीला मोबाईल पासून सावध राहावे व परीक्षेच्या वेळी सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक प्रश्न सोडवला गेला पाहिजे व प्रत्येक प्रश्नाला किती वेळ त्याच्या गुणानुसार द्यावा याचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत आहार, आरोग्य, झोप पुरेसा कसा घ्यावा याचेही मार्गदर्शन केले. माननीय प्राचार्य डॉ. एस एन शर्मा सर यांनीही आपल्या मनोगत आतून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ महेंद्र हिरालाल माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी क्रीडा संचालक डॉ. पी. पी. भोगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. पराग टट्टे, प्रा. पी. एल. सोनवणे, प्रा डॉ आर डी मोरे, प्रा. डॉ. एम. ए. वसावे, एन. सी. सी. चे प्रमुख प्रा. राजू यशोद आदींनी सहकार्य केले.
कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत ताणतणाव मुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा संपन्न
October 11, 2023
तळोदा दि ११(प्रतिनिधी) कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय येथे आज विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी ताणतणाव मुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.