अक्कलकुवा दि २९ (ता प्र )
अक्कलकुवा येथील जामीया कनिष्ठ महाविद्यालयात ५३० विद्यार्थांची रक्त गट तपासणी चे शिबीर संपन्न.
अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया ईशातूल उलूम संचलित मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे जामिया औषध निर्माण महाविद्यालय व अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी अक्कलकुवा यांच्या वतीने मोफत रक्तगट तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. फार्मसी कॉलेज च्या वतीने प्राचार्य तारीक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. हुजेफा पटेल,प्रा.जईमुल्ला इनामदार,प्रा.हिफजुर रहमान,प्रा.अफझल बंड
यांचे पथक व त्यांच्या सोबत फार्मसी कॉलेज मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेऊन एकूण 530 विद्यार्थ्यांची रक्त गट तपासणी केली.
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रफिक जहागीरदार यांनी फार्मसी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांचे आभार व्यक्त करून सदर कामाचे महत्व सांगितले. शिबीर आयोजित करण्यामागचा हेतू रक्त गट माहीत असणे ही काळाची गरज आहे. तसेच आपणांस व आपल्या जवळचे कमीत कमी 5 विद्यार्थ्यांचे रक्तगट वैद्यकीय तातडीच्या मदतीसाठी माहीत असणे अति आवश्यक आहे. शिबीर यशस्वी साठी उपप्राचार्य इम्रान शेख, जहुर शेख,अल्ताफ शेख, जफर शेख, रियाज शेख, अबुजर शेख,वसीम शाह, , यास्मिन शेख, समीना शेख, शबाना खान यांनी विशेष परिश्रम घेतले.