तळोदा दि २९ (प्रतिनिधी) मित्राने सुरू केलेला उपक्रम मित्राच्या मृत्यूनंतर ही सुरू ठेवुन मित्रांनी आपल्या मित्राचा वसा चालवत ख-या अर्थाने आदरांजली वाहिली आहे.
महाराष्ट्रातील साडेतीनशक्तीपीठ मधून अर्धशक्तीपीठ म्हणजे आई सप्तश्रृंगी माता यात्रा दरवर्षी वणी येथे भरते यानिमित स्वर्गवासी सचिन भाऊ जोहरी स्मरणार्थ, सचिन फौंडेशन, बोरद ता.तळोदा, जि. नंदुरबार तर्फे सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो भक्तांनी याचा लाभ घेतला.
महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन २८/१०/२०२३, वार शनिवार रोजी नांदुरी गावाजवळ, महाप्रसादाची वेळ : पहाटे चार वाजेपासून करण्यात आले.
स्वर्गवासी सचिन भाऊ हे बोरद तळोदा तालुका जिल्हा नंदुरबार दहा वर्षापासून साडेतीन शक्तीपीठ मधून अर्धा शक्तीपीठआई सप्तश्रृंगी माता मंदिर येथे होणारी यात्रा मध्ये दहा वर्षापासून महाप्रसादाच्या नियोजन करत होते गेल्या वर्षी एक दुर्दैवी घटनांमध्ये त्यांचे निधन झाले ,त्यांचा मित्र परिवारांने ठरवलं की आपण आत्ता सचिन भाऊ च्या कार्य हातात घ्यावं आणि महाप्रसादाच्या नियोजन करावे तीच खरी श्रद्धांजली ठरेल व त्यांच्या मित्रपरिवाराने एक गडावर जाण्याच्या मार्गावर नांदुरी येथे महाप्रसादाच्या नियोजन केला होते त्याच्यामध्ये साबुदाणे व चहाच्या फराळ वाटप करण्यात आले होते पदयात्रेकरुंनी लाभ घेतला.