तळोदा दि ७(प्रतिनिधी) तालुक्यातील विनोदा ग्रामपंचायतच्या वतीने आदिवासी सेवक पुरस्कारार्थीच्या सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुषमा नाईक होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून करण्यात आले. आदिवासी समाजात तीन दशकापासून अधिक काळापासून शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी भरीव कार्य करणाऱ्या श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ शशिकांत वाणी तसेच माजी सैनिक रूपसिंग पाडवी यांना शासनाकडून नुकताच आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याबद्दल चिनोदा ग्रामपंचायत कडून त्यांच्या सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच सुषमा नाईक उपसरपंच राजेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रताप पाडवी, धनराज मराठे, रत्नदीप पतसंस्थेचे संचालक त्र्यंबकराव मराठे ,ज्येष्ठ नागरिक जगन न्हावी, रमेश मराठे,माजी सरपंच ताईबाई ठाकरे,यांनी डॉ वाणी व श्री पाडवी यांचा सत्कार केला. याप्रसंगी ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ स्वप्नील बैसाणे, सदस्य अलका मराठे,सुरेखा पाटील यांच्यासह ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. तळोदा तालुक्यातील चिनोदा ग्रामपंचायतच्या वतीने आदिवासी सेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ शशिकांत वाणी यांचा सत्कार करतांना उपसरपंच राजेंद्र पाटील सरपंच सुषमा नाईक, धनराज मराठे, सोबत रूपसिंग पाडवी, डॉ स्वप्निल बैसाणे आदी उपस्थित होते.