तळोदा दि १ (प्रतिनिधी) नगर परिषदेच्या शॉपिंग गाळे लिलावात पाच गाळे अनुसुचित जातीसाठी राखीव ठेवण्याची मागणीचे निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद यांना देण्यात आले आहे.
निवेदनाचा आशय असा,
तळोदा नगर परिषद मालकीचे स.नं. 2 व उव आरक्षण क्र. 6 शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेवर नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या भाग क्र. 1,2,3 तळमजला व पहिल्या गाळ्यांचा जाहिर लिलाव प्रक्रिया आपण दिनांक : 06/02/2024 ठेवलेली आहे.
परंतु या लिलावात अनुसुचित जातीच्या व्यवसायिकांसाठी किंवा इच्छुकासाठी राखीव गाळे ठेवण्यात आलेले नाहीत. अनुसुचित जातीतील समुदायाकडे खाजगी मालकीचे गाळे घेण्यासाठी आर्थिक क्षमता नाही. भारतीय संविधानात एस.सी. (SC) प्रवर्गासाठी समुदायाचे जिवनमान उंचविण्यासाठी 13% टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने आपण तळोदा शहरातील अनुसुचित जातीतील समुदायाचे जिवनमान
उंचविण्याचा हातभार लागावा. यासाठी प्रयत्नशिल राहणे आपले कर्तव्य आहे. म्हणून तळोदा नगर परिषदेच्या मालकीच्या गाळेच्या होणाऱ्या जाहिर लिलावात 5 गाळे अनुसुचित जातीसाठी राखीव ठेवण्यात यावे.
अशी मागणी आम्ही परिवर्तन युवा मंच, तळोदा यांच्यावतीने मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर
अध्यक्ष नितीन नेहरू गरुड सचिव
सिध्द्धार्थ नरभवर, लुका दौलत अहिरे,संघत्रिय सुनील नरभवर,विजय वामन कसबे,रितेश प्रवीण नरभवर ,ईश्वर भीमसिंग पाडवी , दिपक वसंत अहिरे,चेतन रमेश साठे,
महेंद्र परशुराम साठे, ईश्वर वसंत अहिरेअर्जुन चुनिलाल सोनवणे,मधुकर खंडू अहिरे ,शुभम विजय बारीक,रवि शांतीलाल पानपाटील,प्रदीप प्रल्हाद ठाकरे, लुका दौलत अहिरे,संघत्रिय सुनील नरभवर,विजय वामन कसबे,रितेश प्रवीण नरभवर ,ईश्वर भीमसिंग पाडवी ,दिपक वसंत अहिरे,चेतन रमेश साठे,महेंद्र परशुराम साठे, इश्वर वसंत अहिरे,अर्जुन चुनिलाल सोनवणे,मयुर खंडू अहिरे ,शुभम विजय खाटीक,रवि शांतीलाल पानपाटील,प्रदीप प्रल्हाद ठाकरे आदींच्या सह्या आहेत.