नंदूरबार दि २८ (प्रतिनिधी) जन्माजात कर्णबधीर असणाऱ्या (दिव्यांग) रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कॉक्लीयर इंम्प्लांट हे ऑपरेशन भगवती कान-नाक-घसा हॉस्पिटल व एन्डोस्कोपी सेंटर नंदुरबार येथे दि. २६ जानेवारी २०२४ रोजी यशस्वीपणे करण्यात आले.
नामवंत कॉक्लीयर इंम्प्लाट सर्जन व मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पीटल परेल मुंबई येथील कान-नाक-घसा विभागाप्रमुख डॉ. सौ. हेतल मारफातिया (पटेल) डॉ. राजेश कोळी, डॉ. अस्मिता मढवी, डॉ. तेजस्वीनी कोळी यांनी १३ महिन्याच्या बेबी आशिया पठाण (नाव बदलेलेले) हिचे भगवती कान-नाक घसा हॉस्पिटल येथे ऑपरेशन करण्यात आले. अतिशय नाजुक समजले जाणाऱ्या काक्लीयर इम्प्लांट ह्या ऑपरेशन व्दारे कानाच्या मागील हाडामध्ये एक यंत्र बसवले जाते. ज्या व्दारे बाहेरील ध्वणीलहरी चे इलेक्ट्रीक ध्वनीलहरीत रुपांतर होऊन जन्मजात कणबिधीर बालकाला ऐकू येण्यास चालना मिळते. त्या आधी ही शस्त्रक्रिया निवडक मेट्रो शहरात केली जात असे, नंदुरबार जिल्हयातील ही पहिली शस्त्रक्रिया ठरली आहे. नंदुरबार जिल्हयाचा विचार केला असता आता पावेतो येथील रुग्णाला नाशिक, मुंबई, पुणे येथे हया सर्जरीकरीता जावे लागत असे. परंतु बरेचसे पालक मोठ्या शहरापावेतो जाण्यास तयार नसतात त्यामुळे बरेचसे बालकांना कर्णबधीरता निदान व उपचारासाठी मुकावे लागत असे. नंदुरबार जिल्हात बऱ्याच बालकाना जन्मतात बहिरेपणा आहे. अश्या रुग्णांसाठी ही सर्जरी एक वरदानच असते.
लहान बालकांमध्ये बहिरेपणा आहे किंवा नाही हे पालकांना लक्षात यायला खुप उशिर लागतो. लहान बालकाला ऐकु आल्यावरच त्याची बोलण्याची क्षमता वाढण्यास सुरवात होत असते. जितके लवकर निदान तितका लवकर उपचार, परंतु त्या उपचारासाठी ची पायपीट आता जिल्हातील रुग्णाला व त्याच्या पालकांना करावी लागणार नाही. राज्य शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (R.B.S.K)अंतर्गत योजनेतून दोनवर्षा खालील जन्मता बहीरेपणा रुग्णांना ही सर्जरी केली जाते- लहान मुलांमधील अंपगत्व व इतर आजारासाठी R.B.S.K ही योजना एक पर्वणीच ठरली आहे.
डॉ. हेतल पटेल, ह्या देशांतर्गत कॉक्लीयर इंम्प्लाट ट्रेनींग प्रोग्राम राबवतात, तसेच केईएम हॉस्पिटल मुंबई येथे नित्यनियामाणे देश-विदेशातील ई.एन.टी. सर्जन यांना कॉक्लीयर इंम्प्लाट शस्त्रक्रियेबाबत ट्रेनिंग दिले जाते. डॉ. राजेश कोळी हे देखील ह्या ट्रेनींग प्रोग्राम मध्ये सहभागी असतात.
डॉ. राजेश कोळी व डॉ. तेजस्विनी कोळी ह्या दांपत्याच्या अथक प्रयानातून तेरा महिन्याच्या बालकाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. आत्याधुनिक साधन सामुग्री आवश्यकता असलेल्या ह्या शस्त्रक्रियेला भगवती हॉस्पिटल येथे डॉ. राजेश कोळी व डॉ. तेजस्विनी कोळी ह्यांनी पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
कॉक्लीयर इंम्प्लाट शस्त्रक्रियेसाठी एक टिम तयार करणेत आली. ज्यामध्ये पिडीयाट्रीशन पिडीयाट्रीक ॲनेस्थेशीयालॉजीस्ट, कार्डीयोलॉजीस्ट, क्लिनीकल ऑडीयोलॉजीस्ट ह्या चमूने अतिशय चोखपणे कार्य केले. जन्मजात हृदय विकार असलेल्या बालकाचे ऑपरेशन दरम्यान हृदयाचे ठोके नियंत्रीत ठेवणे गरजेचे असल्यामुळे ह्या टीमने योग्य ती काळजी घेतली. जिल्हयात प्रथम अशी शस्त्रक्रिया झाल्याने जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हुमणे , नंदुरबार आय.एम.ए चे अध्यक्ष डॉ. विजय पटेल व डॉ. विशाल देसरडा ह्यांनी लागलीच भगवती हॉस्पिटलला भेट दिली व त्याचे कौतूक केले. पूर्व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे ह्यांनी देखील कौतुक केले.
ह्या ऑपरेशन करीता धुळे येथील अनुभवी पिडीयाट्रीक भुलतज्ञ डॉ. जया दिघे व नंदुरबार येथील डॉ. किरण जगदेव, डॉ. गुलाब पावरा यांनी जबाबदारी पार पाडली. बालरोग तज्ञ डॉ. भरतकुमार चौधरी, डॉ. प्रसाद अंधारे (कार्डीयोलॉजीस्ट) क्लिनिकल ऑडियोलाजीस्ट डॉ. कल्पेश चौधरी, डॉ. गणेश पाकळे (रेडीऑलॉजीस्ट) डॉ. रविंद्र पाटील (पॅथोलॉजीस्ट) राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमाचे संयोजक मनोहर धिवरे, अमरसिंग वसावे, नितीन मंडलीक, आबिद रंगरेज, मौलाना जकारीया रहेमानी, हाफिज अखलाक साहब मो. जमील तसेच भगवती हॉस्पिटलचे स्टॉफ सिस्टर अलिशा गावीत, भाग्यश्री वसावे, अर्चना नाईक, शमूवेल व केमीस्ट जागृती कृष्ण पटेल ह्या सर्वाच्या अथक प्रयत्नाने हि मोहीम पार पडल्याचे डॉ. राजेश कोळी यांनी सांगितले.