Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाजपा पदाधिका-यांवर इडीची कारवाई झाल्याचे फ्लेक्स जाहीर करत, राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) एक लाख बक्षिस देऊन शब्द पाळण्याचे प्रति आव्हान

तळोदा दि ५ (प्रतिनिधी) तळोदा येथे स्मारक चौकात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या, भाजपाचे नेत्यांवर इडी सीबीआय ची कारवाई दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी केले होते.याला भाजपा पदाधिकारींनी प्रति आव्हान देत भाजपाचे नेत्यांवर इडीची कारवाईची जंत्री फोटो व नाव पद यासह फ्लेक्स बोर्ड लावुन एक लाख रुपये बक्षीसाची मागणी केली आहे.यामुळे तालुक्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
         भाजपा पक्षावर लावलेले खोटे आरोप अमन जोहरी (भाजपा कार्यकर्ते) यांनी प्रसिद्धीस देत एक लाख द्यावे अशी मागणी बोर्डवरच केली आहे. या स्थानिक पदाधिकारी अमन जोहरी, जगदीश परदेशी, गौरव वाणी, गोकुळ गुरव यांनी राष्ट्रवादीचा आरोप खोडून काढला आहे.
         इडी सीबीआय ची भाजपा नेत्यांवर सुरू असलेली कारवाईचे फोटोसह कोणाकोणावर कारवाई सुरू आहे ते जाहीर केले आहे यांत
लक्ष्मीकांत शर्मा मा.शिक्षणमंत्री म.प्र.,
मोहित कंबोज भाजप मुंबई युनिट सरचिटणीस,सुरेंद्र पटवा भाजप आमदार, म.प्र.,अमर मुलचंदानी मो. नगरसेवक, भाजपा,कुलदिपसिंग सेंगर भौजप आमदार, उन्नाव,पी.व्ही.एस. सरमा भाजप सुरत उपाध्यक्ष, जर्नादन रेड्डी भाजपा नेता, कर्नाटक,दुष्यंत सिंग
असे जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांनी दिलेला शब्द पाळावा व रु.१ लाख भाजपा पक्ष कार्यालयात त्वरीत जमा करावे. असे आवाहन केले आहे.यां राष्ट्रवादी काँग्रेसच्या भुमिकेकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.