जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बुधावल (स्थापना दिनांक : २४ एप्रिल १९२४) शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त जिह्वा परिषद शाळेला आजपर्यंत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून गेलेल्या सर्व शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच शाळेतील विद्यार्ध्याचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शहादा तळोदा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेशदादा पाडवी, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद नंदुरबार चे उपाध्यक्ष सुहास दादा नाईक तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी , पंचायत समिती सदस्या श्रीमती सोनीताई पाडवी, सौ. सुमनताई वळवी, लोकनियुक्त सरपंच गणेश बुधावल सौ. लक्ष्मीताई अजमेर नाईक, उपसरपंच मंगलसिंग पाटील, माजी जिह्वा परिषद सदस्य गणेश चौधरी, माजी पंचायत समिती सभापती रमिलाताई पाडवी, पं. स. उपसभापती प्रतापदादा पाडवी, तळोदा पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, शाळा व्य. समिती अध्यक्ष मंगलसिंग पाडवी, दिलीप वसावे,पोलीस पाटील मंगलसिंग पाडवी,शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक राजुभैया गुरव,सर्व शिक्षकवृंद, निलेश पाडवी विषय शिक्षक (जि प जळगाव), रमेश प्रधान प्राथमिक शिक्षक(पालघर), जयवंत चौधरी शिक्षक (प्रा शिक्षक बेडापाडा ), निलेश पाडवी अधीक्षक आश्रम शाळा शिर्वे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, कार्यक्रमाची प्रस्तावना प्रविण जाधव यांनी तर सूत्र संचालन मुकेश कापुरे (ग्रामसेवक रांझणी) यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गुरव यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.