महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भातील विविध समस्या असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाचा असुविधा आहेत, विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या अटी सोडविण्याच्या हेतूने आदिवासी समाजातील सर्व विधिमंडळ सदस्य यांची मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत विस्तृत बैठक विधानसभा उपाध्यक्ष मा. ना. नरहरी झिरवळ यांचे माध्यमातून घेण्यात आली. सदरील बैठकीत प्रशासन पेसाक्षेत्रातील मागण्यांच्या, अडचणींवर चर्चा करून या दृष्टीने शासन सकारात्मक असल्याचे दिसून आले.
विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी कायम आदिवासींचा प्रश्न व समाजा योजना लाभार्थ्यांना मिळाव्यात यासाठी पुढाकार घेत असल्याने आदिवासी समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या प्रसंगी आभार मानले. या प्रसंगी मा. खा. राजेंद्र गावित, मा. आ. सौ. मंजुळा ताई गावित, मा. आ. किरणजी लहामटे, मा. आ. हिरामण खोस्कर, मा. आ. राजेश पाडवी, मा. आ. भिमराव केराम, मा. आ. राजेश पाटील, मा. आ. सुनिल भूसारा, मा. आ. दौलत दरोडा, मा. आ. विनोद निकोले, मा. आ. श्रीनिवास वणगा आदि उपस्थित होते.