लसुण च्या आड लपवून मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधित अफुचे सुकलेले बोंडे (डोडा) ची बेकायदेशीर वाहतुक करताना आढळून आल्याने एकुण 25,40,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शिरपूर येथील पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनिय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की,मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा कडुन शिरपुरकडे ट्रक क्र. RJ 09 GC 4569 वरील चालक हा त्याचे स्वतःचे आर्थिक फायदयासाठी त्याचे ट्रक मध्ये मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधित अफुचे सुकलेले बोंडे (डोडा) ची बेकायदेशीर वाहतुक करुन घेवुन जात आहे.
पळासनेर गावाजवळ लोकसभा निवडणुक 2024 अनुषंगाने लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर नाकाबंदी करुन सदर वाहनाचा शोध घेणे बाबत आदेशीत केल्याने चेकपोस्टवर नाकाबंदी दरम्यान वाहने तपासणी करीत असतांना रात्री 00.15 वाजेच्या सुमारास बातमी प्रमाणे ट्रक क्र. RJ 09 GC 4569 हे येतांना दिसले. वाहनावरील चालकास वाहन थांबविण्याचा ईशारा केला असता सदर वाहन चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन थांबविले. वाहनातील चालक व क्लिनर यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव चालक (1) सलामुद्दीन निजामुद्दीन, वय-42 वर्षे, रा. दमाखेडी ता. सितामऊ जि. मंदसोर (मध्यप्रदेश), क्लिनर (2) अशोक जगदिश चौहाण, वय 30 वर्षे, रा. मानंदखेडा ता. जावरा जि. रतलाम (मध्यप्रदेश) असे सांगीतले.
सदर वाहनात भरलेल्या मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तरे दिले नाही. वाहनात मोठ्या
प्रमाणात लसुण भरलेले असल्याने अफुचे सुकलेले बोंडे (डोडा) ची खात्री करण्यासाठी सदर वाहन पोलीस ठाण्यात आणुन वाहनाची तपासणी केली असता खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला तो.
1) 10,40,000/- रुपये किमतीचे एकुण 52 किलो वजनाचे मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधीत अफुचे सुकलेले बोंडे (डोडा). कि.अं.
2) 15,00,000/- एक टाटा कंपनीचा ट्रक क्र. RJ 09 GC 4569 जु.वा.किं. अं
एकुण 25,40,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल
सदरची कारवाई पेलीस अधीक्षक, धुळे श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम पवार, पोसई- बाळासाहेब वाघ, पोसई कृष्णा पाटील, पोसई बाळासाहेब वाघ, असई रफिक मुल्ला, असई जयराज शिंदे, पोहेकॉ संतोष पाटील, पोहेकॉ ठाकरे, पोहेकॉ प्रविण धनगर, पोना मोहन पाटील, पोकॉ योगेश मोरे, पोकॉ स्वप्निल बांगर, पोकाॅ संजय भोई, पोकॉ भुषण पाटील, पोकॉ रणजित वळवी यांनी केली असुन सदर वाहन चालक व क्लीनर यांचेवर गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क), 15 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.