१८५७ - ५८ च्या आंबापाणी स्वतंत्रता संग्रामाच्या क्रांतिकारी नेतृत्व वीर बहादुर खाज्या नाईक स्मृति दिनानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे उनपदेव दरा येथे 12 एप्रिल रोजी क्रांतिकारी खाज्या नाईक प्रेरणा दिवस कार्यक्रम साजरी करण्यात येतो. यंदाही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
विशेषतः आदिवासींचे लुप्त होणारे कला कौशल्ये जतन संवर्धन व्हावे म्हणून या कार्यक्रमात तीर कमान स्पर्धा आयोजित करण्यात आले होते आणि या स्पर्धेत सत्तर च्या वर स्पर्धक होते. तसेच ढोल बासरी वादक मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल वाजत नाचत गात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. व ढोल बासुरी वादक याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. एकता परिषदेचे महासचिव अशोकभाई चौधरी, जेष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, रेखा ताई, सांगल्याभाई , निवृत्त उपायुक्त अविनाश वळली, शिवलाल वळली, भिमसिंग वळवी , सतीश पवार, लुका पाटील, राजू पावरा, राज्या महाराज, वेनिलालभाई , जगदीश पवार, सी के पडवी, अभिजित दादा, प्रमोद दादा, वनसिंग दादा, राजेंद्र ठाकरे, सुरेश ठाकरे , लोकनियुक्त सरपंच ताई आदि परिसरातील सर्व प्रमुख मान्यवर व युवा मित्र, सामाजिक कार्यकर्ते राजकिय नेते उपस्थित होते. वीर बहादुर खाज्या नाईक मानवंदना म्हणून मान्यवरांनी तीर कमान मारुन मानवंदना दिली कार्यक्रमाची प्रास्ताविक जेलसिंग पावरा यांनी मांडले तर प्रमुख वक्ता म्हणून विद्याश्रम अकॅडमी लोणखेड़ा येथील प्रा. दिनेश पावरा यांनी ' कठोर परिश्रम घेतले तर यश प्राप्त करण्यासाठी परिस्थिती आडवी येत नाही असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.' वनिता पटले ने 4 एप्रिल हा दिवस काळा दिवस म्हणून निषेध करावा याच दिवशी माणुसकीला काळिमा फासणारी मणिपुर घटना घडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमसिंग पवार यांनी आदिवासी अस्तित्वासाठी आदिवासी बोली भाषा जतन केले पाहिजे असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन कवि संतोष पावरा यांनी केले तर आभार गंगाराम राहसे योगेश पावरा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी एकता परिषद, दरा युवा मित्र मंडळ, ग्रामपंचायत , उत्सव समिती आदींनी मेहेनत घेतली.