Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदुरबार लोकसभेच्या निवडणुक मैदानातील उमेदवारांना चिन्हांचे वाटप

नंदुरबार लोकसभेच्या निवडणुक मैदानातील उमेदवारांना चिन्हांचे वाटप
नंदुरबार दि ३० (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात दुपारी तीन वाजता  नंदुरबार लोकसभेच्या उमेदवारीच्या मैदानातील उमेदवारांना चिन्ह वाटपासाठी, विशेष सभेचे आयोजन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.                    नंदुरबार लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांसाठी चिन्ह वाटपासाठी, सर्व उमेदवार निवडणूक चिन्ह घेण्यासाठी उपस्थित होते, त्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याकरिता 19 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दि. 25 एप्रिल 2024 अखेर दाखल केले होते. दि. 26 एप्रिल रोजी तीन उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद केल्यानंतर पूर्वी 16 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असताना आज माघारी आणखी पाच उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्यानंतर अकरा उमेदवार हे नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक असून त्या 11 उमेदवारांना चिन्ह वाटप, नंदुरबार निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले असून, त्यात बहुजन समाजवादी पार्टीतर्फे उमेदवारी करीत असलेले आनंदा सुकलाल कोळी यांना हत्ती चिन्ह , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी करीत असलेले अँड गोवाल पाडवी यांना हाताचा पंजाचे चिन्ह, भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी करीत असलेल्या डॉ हिना विजयकुमार गावित यांना कमळ चिन्ह , पीपल्स पार्टी ऑफ इंडियातर्फे उमेदवारी करीत असलेल्या निर्मला कागड्या वसावे यांना फळांच्या टोपलीचे चिन्ह , भारतीय आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी करत असलेले रवींद्र रणजीत वळवी यांना हॉकी स्टिक बॉलचे चिन्ह , बहुजन मुक्ती पार्टीतर्फे उमेदवारी करीत असलेले रोहिदास गेमजी वळवी यांना ऑटो रिक्षाचे चिन्ह, वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी करत असलेले हेमंत मन्साराम कोळी यांना प्रेशर कुकरचे चिन्ह , अपक्ष उमेदवारी करत असलेल्या गीतांजली कोळी यांना माईकचे चिन्ह, अपक्ष उमेदवारी करीत असलेले जालम सुमत पवार यांना ट्रक हे चिन्ह, अपक्ष उमेदवारी करीत असलेले दीपककुमार मधुकर शिरसाठ यांना शिट्टी हे चिन्ह, तर अपक्ष उमेदवारी करीत असलेल्या सुशीलकुमार जहांगीर पावरा यांना नागरिक हे चिन्ह देण्यात आले, या चिन्ह वाटपाप्रसंगी दोन उमेदवारांनी एकाच चिन्हावर मागणी केल्याने, त्यांना लहान मुलांच्या हस्ते ईश्वर चिट्ठी काढून चिन्ह वाटप करण्यात आले, त्यात रोहिदास वळवी व निर्मला वसावे या दोघांनीही रिक्षा चिन्हाची मागणी केली होती, त्यात ईश्वर चिट्ठी काढण्यात येऊन रिक्षा हे चिन्ह रोहिदास वळवी यांना देण्यात आले, तसेच अपक्ष उमेदवार गीतांजली कोळी व दीपक शिरसाठ यांनी सुद्धा सिटी या चिन्हाची मागणी केल्याने ईश्वर चिट्ठी काढून त्यात दीपककुमार शिरसाठ यांना शिट्टी चिन्ह देण्यात आले, तर गीतांजली कोळी यांना माईक हे चिन्ह देण्यात आले, यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रमोद भामरे उपस्थित होते.