लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने तृतीयपंथी मतदाराचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी यांनी जिल्हयातील राजकीय पक्षांशी संबंधीत नसलेल्या व तृतीयपंथी लोकांसाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने तृतीयपंथी मतदारांना मतदान करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठीचे आवाहन केले होते.
त्यानुसार नंदुरबार व इतर तालुक्यातील तृतीयपंथी मतदारांची मतदानासंदर्भातील जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद, नंदुरबार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित तृतीयपंथी मतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली.