श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शाळापूर्व तयारी मेळाव्यांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, केंद्रीय मुख्याध्यापक भटू बंजारा, केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा रायते, संजय कोकणी, राजेंद्र कुंभार, जगदीश कोकणी, अरुणा कोकणी, विलास बेडसे, राजेंद्र वसावे, गणेश पाडवी, दिनेश पाडवी, अनिल अहिरे, मालिनी पाडवी, सीमा पाटील, बकाराम सूर्यवंशी, वैशाली कोकणी, छोटीबाई पाटील व अंगणवाडी सेविका, शिक्षक बंधू- भगिनी उपस्थित होते. 
शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत, यावेळी विविध स्टॉल लावण्यात आले. वजन-उंची मोजण्यासाठी स्टॉल, यासंदर्भातील चित्रांमध्ये रंग भरण्यासाठी स्टॉल, विविध शैक्षणिक साहित्य संदर्भातील स्टॉल, मनोरंजक खेळ आणि शाळापूर्व तयारी संदर्भातील पुस्तक वाटपाचा कार्यक्रम सर्व शाळा स्तरावर घेण्यात आला. केंद्रातील सर्व शाळेत विद्यार्थी संख्या मोठया प्रमाणात वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. श्रावणी गावाचे सेवानिवृत्त प्राध्यापक कृष्णा वळवी यांच्यामार्फत उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था व मंडपची व्यवस्था करून देण्यात आलेली होती. शाळापूर्व तयारी कार्यक्रम समन्वयक म्हणून जि. प. शाळेचे शिक्षक ईश्वर गावीत यांनी काम पाहिले. 
मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढील प्रमाणे केंद्रातील सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन व आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद - शिक्षण विभाग, तसेच नवापूर तालुक्याचे शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणे बाबतचे नियोजन शाळांना व पर्यवेक्षकीय अधिकारी यांना कळवावे.
दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा. मेळावा आयोजन करीत असताना मेळाव्याबाबत वस्ती, गावस्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी. व त्यामाध्यमातून पुढील वर्षी जून २०२४ मध्ये इयत्ता पहिलीला दखलपात्र असलेल्या सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात यावे. उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मादर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. १) नोंदणी (रजिस्ट्रेशन) २) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास) ३) बौद्धिक विकास ४) सामाजिक आणि भावनात्मक विकास ५) भाषा विकास ६) गणनपूर्व तयारी ७) पालकांना उपक्रम साहित्य वाटप व मार्गदर्शन या प्रमाणे स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर केल्या जातील व बालकांची शाळापूर्व तयारी घरी करून घेण्यासाठी शाळापूर्व तयारीचे साहित्य सातव्या स्टॉलवर पालकांना वितरीत करण्यात येईल.मुले एप्रिलमध्ये नवीन वर्गात प्रवेश करतात. या वर्षी महिलांनी, विशेषतः मातांनी, मुलांना गावोगावच्या लोकांनी शाळा आणि अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाळापूर्व तयारी’ मेळाव्याचे आयोजन सुरू करण्यात येत असल्याचे मत केंद्रप्रमुख महेंद्र नाईक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक कृष्णा रायते यांनी केले. उपस्थित यांचे आभार शिक्षक राजेंद्र वसावे यांनी मानले.