सुरत दि १२ (प्रतिनिधी) उधना येथे ११ मे १८८८ रोजी थोर विचारवंत, समाज सुधारक,स्त्री शिक्षणाचे प्रणेते ज्योतीराव गोविंदराव फुले यांना महात्मा या पदवीने सन्मानित करण्यात आले. शेतकरी,शेतमजूर,अस्पृश्य दलित, बहुजन व स्त्रियांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या ज्योतिराव फुले यांचा मुंबईतील कोळीवाडा येथे भव्य सत्कार करण्यात आला. नारायण मेघाजी लोखंडे, रावबहादूर वडेकर यांच्या पुढाकाराने अठरापगड जातीच्या लोकांनी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात जनतेच्या वतीने महात्मा ही पदवी असलेले मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीत आणि महाराष्ट्रातील दुसरे समाज सुधारक रावबहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ज्योतिबा फुलेंना वयाच्या ६१ व्या वर्षी महात्मा ही पदवी प्रदान करण्यातआली. आज याo घटनेला १३६ वर्षे पूर्ण झाली. तसेच आधुनिक विचारवंतांनी महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून गौरविले.
महात्मा फुले यांनी केलेले सामाजिक व शैक्षणिक कार्य तसेच तळागाळातील लोकांसाठी केलेले कार्य जसे की, महाराष्ट्रात मुलींसाठी सर्वप्रथम शाळा सुरू करणारे,दलितांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करणारे, विधवांना व अनाथ मुलांना आधार देणारे, शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे, सत्याचे नियम सांगणारे, प्रत्येकाला आधार देणारे, सर्वांचे आधारस्तंभ असणारे, थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक, शिक्षण महर्षी, ज्ञानाचा दाता,स्त्री मुक्तीचे प्रणेते, सामाजिक व शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटवणारे, महान क्रांतिकारक, थोर विचारवंत, मराठी लेखक, समाजातील अज्ञान,दारिद्र्य,जाती-भेद, बालविवाह सती-प्रथा यासारख्या अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण व मागासलेल्या मुला- मुलींचे शिक्षणाची सोय व्हावी म्हणून मुलींची पहिली शाळा काढणारे पहिले भारतीय समाज सुधारक, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंती चे जनक, स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी,कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंचितांचे उद्धारकर्ते, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरूवर्य सत्यशोधक समाजाचे संस्थापक, द्रष्टामहापुरुष राष्ट्रपिता, क्रांतीसुर्य, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे. जोतिबा फुले यांना खरे तर लोकांनीच महात्मा ही पदवी दिली.
*सत्याचा पालन वाला हा धन्य ज्योतिबा झाला*
*पतितांचा पालन वाला हा धन्य महात्मा झाला*
*सत्य हीच नीती, बाकीची कुनिती,ज्योती म्हणे*
त्याचप्रमाणे,
"विद्येविना मती गेली!
मतिविना नीती गेली!
नीतिविना गती गेली!
गतिविना वित्त गेले!
वित्ताविना शूद्र खचले!
इतके अनर्थ एका अविद्येने केले!!
अशा या विचारातून समाजाला शिक्षणास प्रोत्साहन देणाऱ्या व शिक्षणाचा तळापर्यंत प्रचार आणि प्रसार करणारे भारतीय सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक *क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांचा १३६ वा महात्मा दिन* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष रमेश गंभीर महाजन,उपाध्यक्ष.भिकन दगा महाजन,सेक्रेटरी प्रा.विलास देवाजी माळी, उपसेक्रेटरी एकनाथ दगा महाजन,खजिनदार अशोक तानाजी महाजन,सदस्य आत्माराम पौलाद महाजन तसेच श्री क्षत्रिय काच माळी समाज महिला मंडळाच्या सदस्या सौ. योगिता संजय महाजन,सदस्या सौ.नकुबाई कृष्णा महाजन व समाज बांधव,फुले प्रेमी तसेच युवक संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम,उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय व सामाजिक तसेच शैक्षणिक कार्याविषयी व महात्मा दिन विषयी माहिती अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघाचे सुरत जिल्हा संपर्कप्रमुख व श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळाचे सेक्रेटरी प्रा. विलास देवाजी माळी, यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
🙏 *_जय ज्योती! जय क्रांती! जय सावता!!_* 🙏
*लेखन- प्रा.श्री. विलास देवाजी माळी,सर*
*सुरत जिल्हा संपर्कप्रमुख*
अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ कार्यक्षेत्र भारत देश शाखा- गुजरात.
*सचिव*-श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ,उधना, सुरत,गुजरात.मो.६३५३९०३२९५