Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पक्षाच्या जन सन्मान यात्रेचे येवला येथे जंगी स्वागत येवला येथे गुलाबी नाही तर पैठणी जॅकेट.. अजितदादांचा पॅटर्नच बदलला!

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पक्षाच्या जन सन्मान यात्रेचे येवला येथे जंगी स्वागत 
 नाशिक दि १० जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला ) दि ९ रोजी अन्न नागरी व पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला येथील टाऊन हॉलमध्ये जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी महिलांशी दिलखुलास गप्पा मारल्या केल्या.
          लाडकी बहीण योजना तसेच सरकारच्या इतरही योजनांची यावेळी महिलांना सखोल माहिती देऊन त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले.यावेळी सर्व सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.

 येवला येथे गुलाबी नाही तर पैठणी जॅकेट.. अजितदादांचा पॅटर्नच बदलला! 
अजित पवार हे गुलाबी जॅकेटमुळे सध्या चर्चेत आहेत. असं असताना आज अचानक ते पैठणी जॅकेट परिधान केलेले दिसून आले. त्यामुळे आता त्यांच्या या जॅकेटची देखील सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
               ‌जनसन्मान यात्रेच्या दुसऱ्या दिवशी येवला येथे पैठणी विणकरांसोबत संवाद साधला. वस्त्रोद्योगात येवला महाराष्ट्राचे बनारस म्हणून ओळखले जाते. माझे स्वागत आणि सत्कार देखील पैठिणीच्या जॅकेटने झाला.
      येवल्याच्या पैठणीला ऐतिहासिक महत्व आहे. भुजबळ साहेबांच्या ४०-४५ वर्षांच्या राजकीय व सामाजिक अनुभवाचा फायदा येवला व नाशिकला झाला आहे. विणकर समाजाचे संपूर्ण देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. राज्य सरकारने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणा अंतर्गत पुढील पाच वर्षांत २५,००० कोटींची गुंतवणूक करत, तब्बल ५ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे.
      राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच विकासाची राहिलेली आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मी मरेपर्यंत सोडणार नाही. आम्ही जनसेवक आहोत, आम्ही मालक नाहीत. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत राहील