Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोय आश्रम शाळेतील विद्यार्थी मनोहर वसावे यांचेवर बिबटयाने हल्ला करित ठार केल्याप्रकरणी बेजबाबदार अधिकारी विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- आदिवासी वकिल संघाची मागणी

लोय आश्रम शाळेतील विद्यार्थी मनोहर वसावे यांचेवर बिबटयाने हल्ला करित ठार केल्याप्रकरणी बेजबाबदार अधिकारी विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- आदिवासी वकिल संघाची मागणी
अक्कलकुवा दि ३१ (प्रतिनिधी) आदिवासी वकिल संघाकडून अक्कलकुवा तहसीलदार दिलीप गांगुर्डे यांचेमार्फत जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेटी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले की, नंदुरबार जिल्ह्यातील आश्रम शाळा लोय ता. जि. नंदुरबार येथे दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मनोहर कालुसिंग वसावे,वर्ग २ री या शालेय विद्यार्थ्याचा बिबट्याने शाळेच्या आवारात घुसून येते हल्ला केला व त्यात सदर विद्यार्थी मरण पावला.                       दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री बारा च्यासुमारास सदर विद्यार्थी लघवीसाठी शाळेच्या अंगणात गेला असता हा हल्ला जीवघेणा
हल्ला झाला. सदर शाळेला चारही बाजूंनी भिंतीचे पक्के गेट असल्यामुळे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार द्वारे बिबट्या आत घुसून आला असल्याचे सांगितले जात आहे. या आश्रम शाळेला सुरक्षा रक्षक नसल्याने ही घटना घडली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. या निमित्त शाळा प्रशासनाची गंभीर चुक स्पष्ट दिसून येते असल्याने सदर विद्यार्थ्यांचा मृत्यू हा शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाला असे म्हणता येईल.
सदर दिवशी वर नमूद आश्रम शाळेत १. सुरक्षा रक्षक नसणे, २. अधीक्षक यांनी विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी न घेणे. 3. विद्यार्थी करिता शौशालय वापरण्यायोग्यनसल्यामुळे बाहेर लघवी करण्यासाठी मुलाला जावे लागणे. 4. शाळेला पुरेसे संरक्षण न देणे, 5. शाळेत आपत्कालीन यंत्रणा नसल्याने हल्ला झालेल्या विद्यार्थ्यांवर त्वरित उपचार न होणे, अशा गंभीर चूका आश्रम शाळा प्रशासनाने केलेल्या दिसून येतात.
           भारतीय राज्यघटनेतील कलम २१ अन्वये प्रत्येक भारतीय नागरिकास जिविताचा मूलभूत हक्क बहाल केला आहे. राज्यघटनेतील कलम २१अ प्रमाणे शिक्षणाचा मूलभूत हक्क असताना आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांवर बिबट्या द्वारे हल्ला होऊन जीव जाणे हा गंभीर अपराध असून विद्यार्थ्यांच्या जिविताच्या व शिक्षणाच्या मूलभूत हक्काचे तीव्र उल्लंघन आहे.
            आश्रम शाळा लोय, ता. जि. नंदुरबार येथील शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थ्यांवर बिबट्याचा हल्ला होऊन जीव घेण्यासाठी आश्रम शाळा प्रशासनास सक्त कार्यवाही करण्यासाठी खालील मागण्या करण्यात येत आहे.

१. सदर विद्यार्थ्याच्या मृत्यूची जवाबदार आरोपीवर शासन होण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी त्वरित "चौकशी आयोग" नेमण्यात यावा.

2. मयत विद्यार्थ्याच्या मृत्यूस जवाबदार असलेल्या सुरक्षा रक्षक, अधीक्षक, मुख्याध्यापक व शाळा प्रशासनावर तथा वनविभाग येथील दोषी कर्मचाऱ्यावर 'सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक शासन करण्यात यावे.
३. सदर मयत विद्यार्थ्याच्या पालकांना त्वरित १ करोड एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळवून देण्यात यावी.
४. महाराष्ट्रातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत सुरक्षा रक्षक, अधीक्षक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्याची पदे त्वरित भरण्यात यावी.
५. अशा घटना आश्रम शाळेत घडू नये म्हणून आश्रमशाळा प्रशासनासनियमावली देण्यात येऊन ती लागू करण्यासाठी शालेय, प्रकल्प, अप्पर आयुक्त, आयुक्त व मंत्रालय स्तरावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
६. आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य ती सुरक्षा व जीविताची हमी देण्यात यावी.
अशा मागण्यांचे निवेदन अक्कलकुवा तहसीलदार दिलीप गांगुर्डे यांचे मार्फत डॉक्टर मिताली शेट्टी यांना सादर करण्यात आले. निवेदन देताना ॲड. संग्राम पाडवी ,ॲड. रुपसिंग वसावे, ॲड. जितेंद्र वसावे, ॲड. फुलसिंग वळवी, ॲड.रुपसिंग तडवी, ॲड. महेश वसावे ॲड. जेठया वळवी, ॲड. महेश वसावे , ॲड. हिरेसिंग पाडवी , ॲड.गुलाबसिंग ॲड. प्रकाश वळवी,आधी उपस्थित होते.