Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मोलगीच्या पोषण पुनर्वसन केंद्रातर्फे राष्ट्रीय पोषण माहचे आयोजन

मोलगी दि २४(प्रतिनिधी)
             अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पोषण पुनर्वसन केंद्रातर्फे संपूर्ण देशात सकल आहाराची जनजागृती करुन कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पोषण माहचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक गुणवंत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. व्यासपीठावर ग्रामीण रुग्णालयाचे व्यवस्थापक सचिन नाईक, डॉ. खेडकर व अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी हे होते. 
          कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आदिवासी कुलदैवत याहा मोगी मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. आणि विभागातर्फे स्टॉलवर पूरक आहारासाठी विविध प्रकारचे कडधान्य, बिया, भाज्या, भूक वाढवण्यासाठी आवश्यक खाद्यपदार्थ व फळे यांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर पोषण पुनर्वसन केंद्राच्या अधिपरीचारीका पार्वती वळवी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी यांनी सहा महिन्याच्या पुढील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर माता, व स्तनदा माता या सर्वांसाठी आवश्यक असणाऱ्या सकस आहाराविषयी स्थानिक व सोप्या शब्दात माहिती सांगितली. तसेच समुपदेशक मधुकर वसावे कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी व्यसनमुक्ति व स्वच्छतेवर प्रकाश टाकत उपस्थित माता बालकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गुणवंत कांबळे यांनी कुपोषणमुक्तीसाठी विविध विषयावर विचार मांडले व एनआरसी विभागातर्फे उत्तम नियोजन केल्याबद्धल कौतुक केले. 
           या कार्यक्रमासाठी भाऊसाहेब पटेकर पवन पाटील, संजय परमार, अधिपरीचारीका कामी वळवी, कांचन वळवी व प्रमिला वसावे यांची विशेष उपस्थिती होती व परिसरातुन माता बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनंदा वळवी, शारदा परमार व संगीता राठोड यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वळवी यांनी केले तर आभार समपदेशक मधुकर वसावे यांनी मानले.