तळोदा (प्रतिनिधी)स्थानिक गुन्हे शाखेचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की शहादा शहराच्या हद्दीतून प्रकाशा मार्गे अक्कलकुवा व पुढे गुजरात राज्यात तीन, चार- चार चाकी वाहनात अवैध दारूची वाहतूक केली जाणार आहे...
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचे मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रकाशा येथे बातमीची खात्री करून कारवाई करणे कामी सांगितले...
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पथक शहादा पोलीस ठाणे आदि प्रकाशा गावातील काथर्दा फाट्यावर येऊन थांबले असता साध्या गावाकडून प्रकाशा गावाकडे तीन ते चार वाहने एका मागून एक येत असताना दिसले. सदर वाहनांना पोलीस पथकाने हात व टॉर्च देऊन थांबवले असता त्यातील पुढील दोन चार चाकी वाहनातील अज्ञात चालकांनी त्यांचे ताब्यातील वाहने जोरात चालवून पोलिसांसमोर असलेल्या बॅरिगेटला धडक देऊन जोरात अक्कलकुवा कडे पळ काढला.
तसेच मागील दोन वाहने पळ काढत शहादा कडे निघून गेले... त्यावेळेस ठाणे पुणे शाखेचे कर्मचाऱ्यांनी वेळेच्या अपव्यय न करता शहादा शहराकडे जाणाऱ्या वाहनांच्या पाठलाग करता त्यातील एक टोयोटा कंपनीची इनोव्हा कार ही ब्राह्मणपुरी रस्त्याजवळ अडवले असता सदर वाहनातील चालकास ताब्यात घेता त्यास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव ललित कुमार रामू बाई सुमन वय वर्षे ३८ राहणार उदवाडा तालुका पारधी जिल्हा बलसाड राज्य गुजरात असे सांगितले. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाहनाच्या पाठलाग करीत असताना सदर वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे ब्राह्मणपुरी रस्त्यावरील पेट्रोल पंप जवळ सोडून पळ काढला होता..
सदर ताब्यातील दोन्ही वाहनांची तपासणी करताना देशी विदेशी दारू मिळून आली असून ताब्यात घेण्यात आलेला आरोपीस विश्वासात घेऊन सदरच्या माल कोणाकडून आणला तसेच कोठे घेऊन जाणार आहेत याबाबत विचारपूस कर करता त्याने सदरच्या माल हा 2 भरत यादव व 3 डब्ल्यू राहणार वापी जिल्हा बलसाड राज्य गुजरात यांच्या असल्याचे कळवले तसेच पोलिसांचे ताब्यात असलेल्या ह्युंडाई कंपनीची आय ट्वेन्टी चार चाकी वाहनातील पळून गेलेल्या वाहन चालकाचे नाव 4 कमलेश पटेल राहणार उधवाडा तालुका पारधी जिल्हा बलसाड राज्य गुजरात असे सांगितले..
तसेच अक्कलकुवा कडेपॉड काढून निघून गेलेला चार चाकी वाहनांबाबत विचारता XUV 500 वाहनात भरत यादव व डब्ल्यू हे असून दुसऱ्या पळून गेलेल्या चार चाकी वाहनात मोहसीन पठाण राहणार वलसाड राज्य गुजरात असे सांगितले...
सदर कारवाईत एकूण 19 लाख 81 हजार 752 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारू तसेच वाहन असा मध्यमान मिळवून आला असून आरोपींविरुद्ध शहादा पोलीस ठाणे येथे गु. र. नं. 701/2024 भारतीय न्याय संहिता कलम 318 (4),221,281,3(5), सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई), 8,83,108 सोहम मोटार वाहन कायदा कलम 187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री श्रवणदत्त अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशिष कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वसावे मुकेश तावडे सजन वाघ मनोज नाईक रमेश साळुंखे विकास कापुरे पोलीस कॉन्स्टेबल विजय देवरे अभय राजपूत दीपक नाही यशोदीप ओगले अशांनी केले आहे