Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

घरफोडीचे एकुण 4 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश...आंतरराज्यीय टोळी ताब्यात, एकूण 23,34,310/- रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत..

नंदुरबार दि १८(जिल्हा प्रतिनिधी)घरफोडीचे एकुण 4 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश...आंतरराज्यीय टोळी ताब्यात, एकूण 23,34,310/-रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. 29/12/2024 ते दि. 30/12/2024 दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस वसाहतील अज्ञात चोरटयांनी एकुण 04,02,000/-रु. किंमतीचे सोनेचांदीचे दागिणे व रोख रक्कम फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेले म्हणुन शहर पोलीस ठाणे येथे दि. 30/12/2024 गु.र.नं. 764/2024 भा.न्या. संहिता कलम 305 (अ), 331(3), 331(4), 62 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक 08/01/2025 रोजी पो.नि.श्री. हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हा मध्य प्रदेश राज्यातील आरोपींनी केले असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयित इसमांचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश येथे जावून संशयित इसम नामे 1) सबत प्यारसिंग अनारे, वय 29 वर्षे, रा.थिलवाणी, पोस्टे पिंप्रापाणी, ता. कुक्षी जि.धार, मध्यप्रदेश 2) मनसिंग सदनसिंग चव्हाण, वय 21 वर्षे, रा.कुतेडी, पोस्टे नरवाली ता कुक्षी जि धार, मध्यप्रदेश अशांचा शोध घेतला असता ते मिळून आले त्यांना ताब्यात घेवून गुन्हयाबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारांसह सदरचा गुन्हा केले असल्याची माहिती दिली. सदर ताब्यातील आरोपींनी दिलेल्या माहितीचे आधारे गुन्हयातील इतर साथीदार यांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडुन शोध घेणे सुरु असतांना गोपनीय माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील साथीदार आरोपी नामे फुलसिंग हरसिंग मंडलोई, रा. सिंगाचोरी, ता. कुक्षी जि.धार, मध्यप्रदेश हा चोरीचा मुददेमाल विक्री करणेकामी कुक्षी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळालेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने बातमीचे अनुषंगाने सापळा रचुन इसम नामे 3) फुलसिंग हरसिंग मंडलोई, वय 23 वर्षे, रा. सिंगाचोरी, ता. कुक्षी जि धार, मध्यप्रदेश तसेच त्याचेसोबत चोरीचा माल घेणारे सोनार नामे 4) राजललीत सोनी, वय 30 वर्षे, रा.जोबट, जि. अलिराजपुर, मध्यप्रदेश 5) हार्दिक कुमार जसवंत भाई सोनी, वय 32 वर्षे, रा.गरबडा, ता.गरबडा, जि.दाहोद, गुजरात यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना सदर गुन्हयाबाबत विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबूली देऊन जिल्हयातील नंदुरबार शहर, शहादा, तळोदा येथे चोरी केल्याचे सांगितले.
वर नमुद आरोपींकडुन एकुण 23,34,310/- रुपये किमतीचा सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली असुन त्यामध्ये नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुरनं. 764/2024, नंदुरबार तालुक पोलीस ठाणे गुरनं. 375/2024, शहादा पोलीस ठाणे गुरनं. 674/2024 तसेच तळोदा पोलीस ठाणे गुरनं. 04/2025 असे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरहू आरोपीतांनी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश राज्यात सुध्दा घरफोडी केल्याची शक्यता आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित मनेळ हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. मुकेश पवार, तसेच पोहेकॉ मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, बापू बागुल, पोना/मोहन ढमढेरे, पोशि/अभय राजपुत, विजय धिवरे अशांनी केली आहे.