नंदुरबार दि 24 येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त शिवसेना उबाठा पक्षामार्फत रक्तदान व अन्नदान तसेच प्रतिमापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती महानगर प्रमुख पंडित माळी यांनी दिली आहे.
शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात असलेल्या शिवसेनेच्या महानगरप्रमुख कार्यालयात शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. व अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महानगर प्रमुख पंडित माळी, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख राहुल कोळी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख सागर पाटील, युवा सेना शहर प्रमुख दादा कोळी, युवा सेना जिल्हा सचिव दिनेश भोपे, जिल्हा संघटक सुनील सोनार,उपमहानगरप्रमुख इम्तियाज कुरेशी, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष छोटू चौधरी, शिवसैनिक रोहित मराठे, आनंद पाटील, तुळशीराम जाधव, गुड्डू राठोड, गुरुदास राठोड, आकाश वळवी, अभेसिंग वळवी, गणेश राठोड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ रमा वाडीकर व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.