Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त उधना ,सुरत येथे अभिवादन,महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि ४
श्री क्षत्रिय काच समाज सुधारणा मंडळ व श्री क्षत्रिय काच माळी समाज महिला मंडळ,उधना सुरत,गुजरात तसेच अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा गुजरात राज्याच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व "नव्या वर्षातील पहिला सण....."सावित्री उत्सव" म्हणून सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
उधना,सुरत येथे दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त महिला व मुलींसाठी अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा-गुजरात राज्याच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न.....!

क्रांतिज्योती सावित्रीआई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा चे आयोजन* अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री.जितेंद्र सुरेश महाजन व अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा-गुजरात राज्याचे सुरत जिल्हा संपर्क प्रमुख व समाज सेक्रेटरी प्रा.श्री. विलास देवाजी माळी,सर तसेच श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ व श्री क्षत्रिय काच माळी समाज महिला मंडळ उधना,सुरत गुजरात यांच्या संयुक्त विद्यमानाने, महिला व मुलींसाठी या दोन गटात सदर परीक्षेचे आयोजन दिनांक ३ जानेवारी २०२५ वार शुक्रवार रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम तसेच दुपारी ३ ते ४ या नियोजित वेळेत सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन आपल्या माळी समाज मंगल कार्यालयात (समाजवाडीमध्ये) प्लॉट नंबर ७६/७७, आस्तिक नगर, संजय नगर च्या बाजूला,लिंबायत, उधना,सुरत येथे करण्यात आले. तरी सदर सामान्य ज्ञान स्पर्धेत महिला व मुली या दोन्ही गटात ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत सहभागी महिला व मुलींना सहभागाबद्दल अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे दोन्ही गटात प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक(बक्षीस) श्री क्षत्रिय काच माळी समाज महिला मंडळाच्या सदस्या सौ.जागृती गुणवंत माळी व सौ.विमलबाई जगन्नाथ माळी तसेच सौ. ललिता विलास महाजन यांच्याकडून सौजन्य म्हणून देण्यात येणार आहे. तरी याप्रसंगी उधना,सुरत येथील श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळाचे,अध्यक्ष श्री. रमेश गंभीर महाजन उपाध्यक्ष श्री.भिकन दगा महाजन सेक्रेटरी प्रा.श्री.विलास देवाजी माळी,सर उपसेक्रेटरी श्री.एकनाथ दगा महाजन खजिनदार श्री.अशोक तानाजी महाजन सदस्य श्री. पुंडलिक मोतीलाल महाजन सदस्य श्री.प्रविण रामचंद्र महाजन सदस्य विजय तुकाराम महाजन ज्येष्ठ समाज बांधव श्री. रामचंद्र चिंतामण महाजन समाज बांधव श्री.दिपक चंद्रभान महाजन,सर समाज बांधव श्री. भरत दिनकर चौधरी,सर तसेच महिला मंडळाच्या सेक्रेटरी,सौ. लताबाई विठ्ठल महाजन उपसेक्रेटरी सौ.विमलबाई जगन्नाथ महाजन खजिनदार गं.भा.आशाबाई शिवदास महाजन उपखजिनदार सुनंदाबाई लक्ष्मण महाजन सदस्या सौ.ठगुबाई युवराज महाजन सदस्या सौ.मंगलबाई आत्माराम महाजन सदस्या सौ. कलाबाई संतोष महाजन सदस्या सौ. सुलोचना मधुकर महाजन सदस्या सौ.नकुबाई कृष्णा महाजन सदस्या सौ.जागृती गुणवंत माळी सदस्या सौ.योगिता संजय महाजन सदस्या सौ.चंद्रकलाबाई विकास महाजन सदस्या गं.भा.ज्योती सुनील महाजन सदस्या सौ.सुनिता रामदास महाजन सदस्या सौ. प्रतिभा संजय महाजन सदस्या सौ. प्रतिभा एकनाथ महाजन सदस्या सौ.ज्योती सोनू महाजन सदस्या सौ.पुष्पा दिनेश शेलकर सदस्या सौ.शारदा मोतीलाल माळी सदस्या सौ. प्रतिभा राजेंद्र महाजन सदस्या सौ.रत्नाबाई कैलास महाजन सदस्या सौ. सुरेखाबाई विनोद महाजन सदस्या सौ.रत्‍नाबाई भिकन महाजन तसेच समाजातील सर्व माता-भगिनींचे अनमोल सहकार्य व उपस्थिती लाभली.
सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी परीक्षा समन्वयक अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ शाखा-गुजरात राज्याचे सुरत जिल्हा संपर्कप्रमुख व समाज सेक्रेटरी प्रा.श्री.विलास देवाजी माळी,सर,यांनी काम पाहिले. तसेच पर्यवेक्षक म्हणून सहकार्य श्री.दिपक चंद्रभान महाजन,सर व श्री.भरत दिनकर चौधरी,सर यांनी केले.तसेच सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी श्री क्षत्रिय काच समाज सुधारणा मंडळाच्या सर्व सदस्यांनी व श्री क्षत्रिय काच माळी समाज महिला मंडळ, उधना,सुरत गुजरात तसेच सर्व समाज बंधू-भगिनींनी व सदर सामान्य ज्ञान परीक्षेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.