निवेदनाचा आशय असा,सार्वजनिक विभागात एकूण मंजूर पदे ४८ हजार १६८ आहे. त्यापैकी ३ हजार ८८० पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.राखीव पदापैकी अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या केवळ २ हजार ६२१ आहे. त्यापैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले २ हजार ३२८ आहे.
अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी , कर्मचाऱ्यांची संख्या २८२ आहे.तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या २३५ आहे. तब्बल ४७ पदे गायब करण्यात आली आहे. अनुसूचित जमातींचा १ हजार २५९ पदांचा अनुशेष शिल्लक आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची आणि शासन निर्णय दि.२१ डिसेंबर २०१९ ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आदिवासी समाज बांधवांचा आरोप आहे.
अनुसूचित जमाती पदभरती तपशील
संवर्ग/एकूण मंजूर पदे/राखीव पदे/भरलेली पदे/अधिसंख्य पदे
गट अ /९२८६/६४९ / ५११ /१०
गट ब/२२३३ / १५६ /२९ /२
गट क/२७१९७/२१८९/१४५७/१६५
गट ड /९४५२ / ८८६ / ६२४ /१०५
--------------------------------------------
४८१६८/ ३८८०/२६२१/२८२
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात आदिवासी समाजाचा पुर्वीचा अनुशेष १ हजार २५९ पदांचा शिल्लक आहे. आणि अधिसंख्य केलेली २८२ पदे अशी एकूण १ हजार ५४१ पदे रिक्त आहे.अनुसूचित जमाती उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम राबवून बेरोजगार आदिवासी उमेदवारांना न्याय देण्याची मागणी तहसिलदार अक्कलकुवा यांच्या मार्फत केलेली आहे यावेळी निवेदन देताना ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष नितीन तडवी , तालुकाध्यक्ष सिमादादा तडवी, तुषार नाईक, गंगाधर वसावे आदी उपस्थित होते.