Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सरदार पटेल प्राथमिक शाळेत गुण गौरव कार्यक्रम संपन्न

सरदार पटेल प्राथमिक शाळेत गुण गौरव कार्यक्रम संपन्न 

नंदुरबार दि ४ (प्रतिनिधी)सरदार पटेल प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वाटप,  गुण गौरव कार्यक्रम आज झाला. सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रमण पाटील अध्यक्षस्थानी होते.
      संचालक डॉ. वसंत पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष मुरार पाटील,शालेय समिती चेअरमन ॲड. प्रभाकर चौधरी, युवा उद्योजक नितेश अग्रवाल, दुय्यम निबंधक सुरेश पवार,  सहायक पोलीस निरीक्षक राजन मोरे, ग्रीन सिटी सोल्यूशनचे फाउंडर अंतराज गवळे, मुख्याध्यापिका सितादेवी चौरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन केले. 

 राजन मोरे यांनी मनोगत व्यक्त केले . सुरेश पवार यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती करत असताना आपल्या देशाच्या प्रगतीला देखील हातभार लावावा असे सांगितले. संचालक वसंत पटेल, संचालक रमण पाटील यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले. नितेश अग्रवाल, सुरेश पवार या दात्यांनी शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर भेट दिले.

तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत म्हटले. मुख्याध्यापिका सितादेवी चौरे यांनी प्रस्ताविक केले.  ज्येष्ठ शिक्षिका रेवती भदाणे यांनी सिंहावलोकन केले. विद्यार्थिनींनी व्यक्तिगत आणि समूहनृत्य केले.अमोल पाटील, ज्योती पाटील यांनी सूत्र संचालन केले. प्रशांत पाटील यांनी आभार मानले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.