एससीइआरटी, पुणे आणि डायट, नंदुरबार मार्फत "शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण" संपन्न.
नंदुरबार दि ९ (प्रतिनिधी) एससीइआरटी, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या धोरणात उल्लेखित केल्याप्रमाणे शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्त्रापासून माध्यमिकस्त्रापर्यंत प्रत्येक शिक्षकाचे सक्षमीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे धोरणातील तरतुदीनुसार शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने सर्व स्तरांवर शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. सदर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षक निश्चितच प्रत्यक्ष वर्गामध्ये प्राप्त नवीन ज्ञानाच्या आणि कौशल्यांचे उपयोग करतील ज्यायोगे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंची होण्यास मदत होईल असे अपेक्षा एससीआरटीचे संचालक मा. राहुल रेखावार (भा.प्र.से.) यांनी केली आहे.
डायट, नंदुरबार येथे आयोजित शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 हे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डायट), नंदुरबारच्या प्राचार्य डॉ. भारती बेलन, जिल्हा प्रशिक्षण समन्झयक डॉ. राजेंद्र महाजन, सहसमन्ध्यक डॉ. वनमाला पवार यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सुमारे 180 शिक्षकांनी सहभाग घेतला. या शिक्षकांना तालुकास्त्रीय प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करावयाचे आहे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सदरचे प्रशिक्षण घ्यावयाचे आहे.
राज्यस्मृरावर सर्व जिल्ह्यात जिल्हास्तरीय तज्ञ मार्गदर्शकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून नंदुरबार येथे जिल्हास्त्रावर या तज्ञ मार्गदर्शकांनी तालुकास्त्रीय तज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा समन्वयक डॉ. राजेंद्र महाजन आणि सहसमन्ध्यक डॉ. वनमाला पवार यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले. सदर प्रशिक्षणामध्ये एकात्मिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून विविध विषयांच्या समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखडा, पायाभूत स्मर, समग्र प्रगती पत्रक क्षमता आधारित मूल्यांकन, क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकनाची नीती, प्रश्न निर्मितीचे प्रकार, क्षमता आधारित प्रश्न निर्मितीची कौशल्य, उच्चस्त्रीय विचार प्रवर्तक प्रश्न, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा 2024-25 इ. विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.
राज्यस्त्रावरील प्रशिक्षणासाठी विशाल चव्हाण (जि. प. शाळा, कोचरा ता. शहादा), ज्ञानेश्वर बोरसे (जि.प. मराठी शाळा, बर्डीपाडा, ता. धडगाव), बालकिसन ठोंबरे (जि.प. मराठी शाळा, आमलान, ता. धडगाव), गोविंद वाडीले (जि.प. उच्च प्राथ. शाळा, बिजादेवी, ता. नवापूर), दिलीप गावित (जि.प. शाळा, बोरखंड, ता. नवापूर), प्रकाश गवळे (डी. आर. हायस्कूल व ज्यु. कॉलेज, नंदुरबार), प्रशांत बागुल (श्रॉफ हायस्कूल व ज्यु. कॉलेज, नंदुरबार), दयाराम माळी (न्यू इंग्लिश स्कूल, उमरदे, ता. नंदुरबार) महेशकुमार चौधरी (आर. जी. पाटील विद्यालय, डांबरखेडा, ता. शहादा) डॉ. उमेश शिंदे (डी. आर. हायस्कूल व ज्यु. कॉलेज, नंदुरबार) यांनी जिल्हा स्तरावर प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून कामकाज केले.
सदर प्रशिक्षणाचे आयोजन व नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व प्रेरणादायी होईल असे करण्यात आले होते प्रशिक्षणातून क्षमतावृद्धी सोबतच गटकार्याच्या माध्यमातून प्रात्यक्षिक कार्य देखील करून घेण्यात आले तसेच व्यक्तिमत् विकासावर देखील भर देण्यात आला. शिक्षकांची निवासाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. या प्रशिक्षणासाठी डायट मधील अधिकारी डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. वनमाला पवार, डॉ. बाबासाहेब बडे, सुभाष वसावे, विनोद लवांडे, प्रदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कालावधीत रोज सकाळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, प्रार्थना यांचे सामूहिक गायन झाले. गटकार्य आणि विविध कृतीयुक्त असे ज्ञानातून आणि मोकळीकांच्या माध्यमातून क्षमता वृद्धी होण्यासाठी मदत होईल अशा आत्मविश्वास प्रशिक्षणार्थीनी व्यक्त केला. अतिशय गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असे प्रशिक्षण हे डायट, नंदुरबार मार्फत आयोजित करण्यात आले, या प्रशिक्षणाचा भरपूर आम्हास उपयोग होईल असे सांगितले यावेळी यजुवेंद्र देवरे, महेंद्र बारी, पुष्कराज पाडवी उपस्थित होते.
L