शिरपूर दि १३(प्रतिनिधी)तालुक्यातील नवागांव (बुडकी) येथील मानाची होळी पाहण्यासाठी हजारो नागरीकांनी हजेरी लावली. तसेच रात्रभर पारंपारिक पद्धतीने नृत्य करुन आदिवासी बांधवांनी आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवले...
नवागांव येथील होळीला मध्यप्रदेश - महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर असल्याने विशेष महत्त्व आहे. सदर होळी पहाटे पाच वाजता पेटविले जाते. ही होळी पाहण्यासाठी जिल्हयातुनच नव्हे तर इतर जिल्हे, परराज्यातील हजारो नागरीक उपस्थित होते. रात्रभर पारंपरिक आदिवासी नुत्य करण्यात आले. नवागांव येथील रस्त्यावर दुपारपासूनच गर्दी झाली होती. तसचे समृहनुत्य, काली, बाबा, बुध्या यांनी आदिवासी नृत्याचा आंनद घेतला. होळीचा दिवशी आदिवासी समाजात नवस फेडण्याची प्रथा आहे. या काळात नवस फेडणारी आणि व्रत करणारी व्यक्ती घरचे अन्न ग्रहण करत नाही. तसेच खाटेवर किंवा पलंगावर झोपत नाही. पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही. होळी पेटेपर्यंत त्याचे नृत्य व गायन सुरू असते.
होळीच्या महिनाभर आधी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे दर्शन झाल्यानंतर कुर्र् अशी हाळी देवून ढोल, मांदलवर थाप मारून होळीचा दांडा रोवला जातो. त्या महिन्याला आदिवासी 'दांडाचा महिना' म्हणतात. पौर्णिमेच्या दिवशी दांडा गाडला जातो त्या दिवसापासून आदिवासी कुटुंबात लग्न, उत्तर कार्य, नवीन घर बांधणे, जीवंत झाड कापणे पुर्ण पणे बंद केले जाते. ती अलिखित आचारसंहिता समाजात सर्वांना पाळावी लागते.
या कालावधीत कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर भगत, बोडवाकडे एक मुठभर धान्य घेऊन जातात. आदिवासी समाजात भगत, पुजारा, बोडवा, मोडवी (इतिहासकार) याना आजही मानाचे स्थान आहे. सातपुडा परिसरात होळी अगोदर याहा मोगी मातेचे पुजन होते तदनंतर अमावस्या येते व ज्यादिवशी चंद्र दिसतो त्या दिवसापासून होळीचा नवस म्हणजेच पालनी केली जाते...
यावेळी मा.काशीराम पावरा (आमदार) जितेंद्र पावरा, मनजीत पावरा (बोराडी)लक्ष्मण पावरा (पो.पाटील),खंडु पावरा(वनकर्मचारी शहादा), जयदास पावरा,किसन पावरा, कावा, मेरवान, शरद, अजय, उपस्थित होते....