Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलन नागपूर येथे होणार ...दोन लाख समाज बांधवांचा उपस्थितीचा अंदाज

संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलन नागपूर येथे होणार ...

पुणे दि २४ (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्तरावर संत नामदेव महाराज यांचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली या संस्थेचे जानेवारी २०२६ मध्ये नागपूर येथे अतिशय दिव्य व भव्य स्वरूपात संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलन होणार असून या संमेलनात सुमारे दोन लाख समाजबाधवांचा सहभाग असेल. याबाबत रुपरेषा ठरवण्यासाठी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष  भास्करराव टोम्पे (अमरावती), राष्ट्रीय कार्याध्यक्ष  ईश्वर धिरडे (नागपूर),  राष्ट्रीय समन्वयक  अनंत जंगजोड (अमरावती) यांनी नुकतेच दिल्ली येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक मा. संजय नहार यांच्या पुणे येथील निवासस्थानी रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी बैठक झाली. यावेळी संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलनाचे नागपूर येथील ठिकाण, दिनांक, स्वागताध्यक्ष,  प्रमुख पाहुणे, पुरस्कार, उपस्थित  समाजबाधवांचे निवास व भोजनाचे नियोजन याबाबत चर्चा झाली. यावेळी नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सरचिटणीस डॉ. अजय फुटाणे, प्रवीण शिंत्रे, महेश मांढरे, ना.स.प. पुणे शहराचे अध्यक्ष संदीप लचके, सचिव सुभाष मुळे, रमेश माळवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सर्व पोटशाखेतील राष्ट्रीय पदाधिकारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, शरद पवार यांची भेट घेऊन संमेलनात समाजातील तरुण व महिलांना नेतृत्वाची संधी देऊन त्यांचे विशेष कार्यक्रम राबविले जातील अशी माहिती नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे , कार्याध्यक्ष ईश्वर धिरडे यांनी दिली. यासाठी दि. २४ ते २६ मार्चपर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील उपस्थित समाज बांधवांना संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलनाबाबत माहिती देणार आहेत. यासाठी दि. २४ रोजी सातारा जिल्ह्यातील दौ-यात सातारा जिल्हाध्यक्ष सुनील पोरे (म्हसवड), नामदेव समजोन्नती परिषदेचे पदाधिकारी, महासंघाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.