Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नवागाव येथ होळीच तयारी पूर्ण १२ मार्च रोजी होळी दहन कार्यक्रमाचे आयोजन

शिरपूर दि १०(प्रतिनिधी) आदिवासी बांधवांसाठी पर्वणी असलेल्या भोंगऱ्या सणाची सांगता होत असताना बोराडी गावाजवळील नवागाव येथे होळी पूर्वीच होळी (१२ रोजी) पेटविली जाणार आहे. विधिवत पूजा केल्यानंतर रात्रभर ढोलच्या निनावत नृत्य केल्यानंतर पहाटेच्या सुमारास होळीचा शिगा झेलला जाणार असून त्यानंतर गावातून धान्य गोळा केले जाणार आहे.
  १२ रोजी बोराडी गावापासून ५ किमी अंतरावर बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवागाव येथे होळी उत्सव रात्रभर साजरा केला जातो. तालुक्यातील सारे आदिवासी बांधव एकत्र येऊन ढोलच्या तालावर नृत्य करून आनंद लुटतात, शिरपूर, चोपडा, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा,धडगांव, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर तसेच मध्यप्रदेशातील आदिवासी पारंपरिक वेशभूषेत येऊन आदिवासी वाद्य ढोल, मांदल, पावी व थावी आदी नृत्यासाठी लागणारे साहित्य घेऊन येत असतात. ज्या आदिवासी तरुणाईने ५ दिवसाचे उपवास केलेले असतात असे ४-५ तरुण होळीसाठी लागणारा बांबू घेण्यासाठी जातात, तो बांबू तोडून न आणता मुळापासून खोदून पायी संध्याकाळपर्यंत गावात आणला जातो. त्यानंतर विधिवत पूजा केल्यानंतर रात्री होळी पेटविली जाते. परिसर विद्युत रोषणाई सजविला जातो. त्यानंतर गटा गटाने आलेले ढोल वादक मोठ्या संख्येने गर्दी करून तसेच आदिवासी स्त्री-पुरुषांसाठी तरुणाई, आबालवृद्ध, लहान मुले आपल्या पारंपरिक ढोलच्या तालावर रात्रभर नाचतात. 
   तसचे दुकानदारांना व ढोल, वाद्य, होळी मानतेचा बंधन बांधणाऱ्या व संस्कृतीचे जतन करणाऱ्या बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जितेंद्र पावरा - डिझाईनर यांनी केले आहे येत आहे....
  होळीच्या तयारी साठी गाव पाटील लक्ष्मण पावरा, श्री.खंडु पावरा,जितेंद्र पावरा,मेरवान पावरा,वारती कावा पावरा,जयदास पावरा, सरपंच इंदिराबाई विश्वास पावरा, माजी पंचायत समिती सदस्य विश्वास पावरा,अनिल पावरा, बागाबाई लालज्या पावरा, रमेश पावरा, किसन पावरा, तसेच गावकरी आदी प्रयत्नशील आहेत....