Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हास्तरीय नवोपक्रम पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

 शहादा दि २५(प्रतिनिधी) राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25 अंतर्गत जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले. 
शैक्षणिक नवकल्पनांना चालना देणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. निकाल जाहीर झाल्यानंतर विजेत्यांचा सत्कार करण्यासाठी 24 मार्च 2025 रोजी संस्थेच्या प्रांगणात जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या प्रसंगी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

    समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्राचार्या डॉ. भारती बेलन होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. महाजन सर, डॉ. बडे सर, मा. प्रदीप पाटील, मा. विनोद लवांडे, मा. वसावे सर यांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक-उच्च माध्यमिक अशा तीन गटांमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला.

स्पर्धेतील विजेते
पूर्व प्राथमिक गट
प्रथम: बबिता रोशनसिंग पाडवी
द्वितीय: निशा छोटूलाल वळवी
तृतीय: अर्चना भिकन सूळ
चतुर्थ: कल्पना कुंदन वळवी

प्राथमिक गट
प्रथम: मनीषा हरी पवार
द्वितीय: डॉ. शीतल विकास अजबे
तृतीय: सुनील भिका पवार
चतुर्थ: वर्षा कांतीलाल साळुंखे
पंचम: रोहिणी गोकुळराव पाटील
उत्तेजनार्थ: मीनाक्षी पंकज भदाणे, रवींद्र भाईदास पाटील

माध्यमिक व उच्च माध्यमिक गट
प्रथम: जयश्री कल्याणराव चव्हाण
द्वितीय: डॉ. वैशाली शांताराम शिंदे
तृतीय: चेतन रमेश पाटील
चतुर्थ: विद्या कुंदन सोनवणे
पंचम: सुरेश अशोक जगदाळे
उत्तेजनार्थ: गायत्री विश्वास पाटील, भगवानसिंग भरतसिंग राजपूत


          स्पर्धेचे समन्वयक डॉ. वनमाला पवार मॅडम यांनी स्पर्धकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. "नवोपक्रम स्पर्धेमुळे शिक्षकांना त्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळतो, तसेच शिक्षण अधिक प्रभावी बनवण्यासाठी हे उपक्रम महत्त्वाचे ठरतात," असे त्यांनी सांगितले.
राज्यस्तरावरही नंदुरबारचा झेंडा
जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या शिक्षकांपैकी काहींची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड झाली.

पूर्व प्राथमिक गट:
बबिता रोशनसिंग पाडवी – राज्यस्तरीय प्रथम क्रमांक
अर्चना भिकन सूळ – उत्तेजनार्थ पुरस्कार
माध्यमिक-उच्च माध्यमिक गट:
जयश्री कल्याणराव चव्हाण – राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक
विद्या कुंदन सोनवणे – उत्तेजनार्थ पुरस्कार
               या शिक्षकांचा एम. एस. सी.ई.आर.टी., पुणे येथे विशेष सत्कार करण्यात आला.

नवोपक्रमांना मिळतेय प्रेरणा

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सर्व अधिकारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. शिक्षकांनी प्रयोगशीलतेच्या माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी कसे होईल, याचा वस्तुपाठच घालून दिला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांनी आपले नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करून नंदुरबार जिल्ह्याचा सन्मान वाढवला.

सर्व विजेत्यांचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले!