नंदुरबार दि ११(प्रतिनिधी)
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या क्षेत्रिय कार्यालयात अनुसूचित जमातीची गट-अ ते गट-ड संवर्गातील १ हजार ५४१ पदे रिक्त आहे.ही पदे विशेष पदभरती मोहीम राबवून भरण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग (१६-ब ) उपसचिव यांना मा.जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या मार्फत निवेदन पाठवून ट्रायबल फोरम नंदुरबार चे जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी मागणी केली आहे.
सार्वजनिक विभागात एकूण मंजूर पदे ४८ हजार १६८ आहे. त्यापैकी ३ हजार ८८० पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.राखीव पदापैकी अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या केवळ २ हजार ६२१ आहे. त्यापैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले २ हजार ३२८ आहे.
अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी , कर्मचाऱ्यांची संख्या २८२ आहे.तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या २३५ आहे. तब्बल ४७ पदे गायब करण्यात आली आहे. अनुसूचित जमातींचा १ हजार २५९ पदांचा अनुशेष शिल्लक आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची आणि शासन निर्णय दि.२१ डिसेंबर २०१९ ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आदिवासी समाज बांधवांचा आरोप आहे.
*अनुसूचित जमाती पदभरती तपशील*
संवर्ग/एकूण मंजूर पदे/राखीव पदे/भरलेली पदे/अधिसंख्य पदे
गट अ /९२८६/६४९ / ५११ /१०
गट ब/२२३३ / १५६ /२९ /२
गट क/२७१९७/२१८९/१४५७/१६५
गट ड /९४५२ / ८८६ / ६२४ /१०५
--------------------------------------------
४८१६८/ ३८८०/२६२१/२८२
" राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात आदिवासी समाजाचा पुर्वीचा अनुशेष १ हजार २५९ पदांचा शिल्लक आहे. आणि अधिसंख्य केलेली २८२ पदे अशी एकूण १ हजार ५४१ पदे रिक्त आहे.अनुसूचित जमाती उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम राबवून बेरोजगार आदिवासी उमेदवारांना न्याय देण्याची मागणी केलेली आहे.
-- नितीन तडवी जिल्हाध्यक्ष, ट्रायबल फोरम नंदुरबार