Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शहादा येथे शिवपुराण कथा मंडप मार्गावर तळोदा येथील तरुणांचा माध्यमातून शिवभक्तांना लस्सीचा पाकीटांचे वाटप

तळोदा ( वा) आंतरराष्ट्रीय शिव महापुराण कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या पाच दिवसीय श्री शिव महापुराण महाकथेचे आयोजन मोहीदा शिवार शहादा येथे करण्यात आले आहे. कथा श्रवण करण्यासाठी 
 लाखो भाविकांची उपस्थितीती आहे.
          येथील श्री शिव महापुराण महाकथा समितीच्या वतीने एक एप्रिल ते ५ एप्रिल पावेतो आयोजन करण्यात आले आहे.या ठिकाणी नाश्ता, जेवण,पिण्याचे पाणी, सर्व व्यवस्था असल्या तरी तरुण शिवभक्त भाविक पूण्य कमावण्यासाठी स्वखर्चाने कथा मंडप मार्गावर उभे राहुन येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना पाणी, बिस्किटे, नाश्ता,चाॅकलेट,या सारख्या वस्तुंचे वाटप करीत आहेत,ही प्रेरणा घेऊन तळोदा येथील तरुणांना कथेच्या परीसरात लस्सी चे पाकीटांचे वाटप करुन कथा कार्यक्रमात आपली सेवा दिली आहे.यावेळी
पुर्वेश चौधरी,राज मगरे,जयेश सागर,यश टवाळे,दिवेश पाटील,यश हिवरे,रौनक माळी,पीयूष माळी,अंश मगरे,मोक्षित मगरे,धीरज सूर्यवंशी आदींनी लस्सीचे वाटप केले.