Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शासकीय आश्रम शाळा डाब ता अक्कलकुवा येथे क्रातीसूर्य महात्मा फुले जयंती साजरा

मोलगी दि ११(प्रतिनिधी) येथील शासकीय आश्रम शाळा डाब ता अक्कलकुवा येथे क्रातीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मोलगी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्वास पावरा व बार्टीचे ब्रिजलाल पाडवी तर अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गेमसिंग वसावे होते. 
             कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रातीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना अर्जुन चव्हाण यांनी केली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बार्टीचे तालुका समन्वयक ब्रिजलाल पाडवी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्ताने भारताचे संविधानाचे महत्त्व पटवुन सप्ताह अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमावर माहिती दिली.  
         यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी निंबध स्पर्धा घेण्यात आली त्यानंतर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मोलगी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्वास पावरा यांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले.
      यावेळी विश्वास पावरा साहेबांनी शिक्षणाचे महत्त्व पटवुन दिले,ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वतः शिस्त पाडण्याचे आव्हान केले. शेवटी बाल वयात लग्न करु नये जोपर्यंत शिक्षण पूर्ण होत नाही असे विद्यार्थ्यांना प्रतिपादन केले. शाळेतील आपसिंग वसावे, संजय मोरे, अर्जुन चव्हाण मनोगत व्यक्त केले. शेवटी राष्ट्रीय गाणने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला
                कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गेमसिंग वसावे,अर्जुन चव्हाण,संजय मोरे,वनसिंग वळवी,मंगेश वसावे,सायसिंग वळवी, धनेश वसावे, गोविंद वसावे, अमरसिंग राऊत, रतिलाल वसावे, आपसिंग वसावे स्वाती कपाळे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक अर्जुन चव्हाण यांनी तर आभार करमसिंग पावरा,यांनी मानले.