Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पिंगाणे गावात कृषी कन्यांचे आगमन शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचे आयोजन

शहादा दि. ६ (प्रतिनिधी) शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक संस्थेचे के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत अंतीम वर्षाचे विद्यार्थी पिंगाणे येथे दाखल झाले असून, शेतकऱ्यांना त्या मार्गदर्शन करणार आहेत.
कृषिकन्या, संस्कृती धोदरे, भूमिता पावरा, स्नेहा पाटोळे, योगेश्वरी पाटील, सुष्मिता गुलाले, निशिगंधा कुबाडे विद्यार्थिनी गावात राहणार असून शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे प्रात्यक्षिकांसह आयोजन करणार आहेत, यात शेतजमिनीचे, माती व पाणी परीक्षण,विविध पिकांची लागवड ,तंत्राज्ञान ,पिकांवर येणारे रोग,त्यासंबंधित माहिती व त्यांचे निवारण,आदी.. विषयांवर मार्गदर्शन करतील. त्यांच्या समवेत गावातील सरपंच तैलाल पावरा , पोलीस पाटील दीपक पाटील, छोटुलाल चौधरी, नारायण पाटील, संदीप पाटील, भगवान पाटील , गावातील शेतकरी व इतर ग्रामस्थांची भेट घेऊन या कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्दिष्ट व त्यासंबंधित ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी कृषी करण्याचे कौतुक व समाधान व्यक्त केले. 
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी कन्या संस्कृती धोदरे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार योगेश्वरी पाटील यांनी मानले.