Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जागतिक आदिवासी गौरव दिवस, आत्मसन्मानाचा दिवस - लेखक योगेश मोगरे आदिवासी एकता परिषद( भिलवंश ग्रुप शहादा )

*#_9ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस*
स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्य संग्रामात कित्येक आदिवासी वीरांनी बलिदान दिले, शहीद झाले. शिवरायांच्या सैन्यात रक्षणासाठी शिवनेरी किल्ल्यावर जे आदिवासी वीर लढले, चारशेपेक्षा जास्त जणांचे शीर मुघलांनी छाटले व त्याचे थडगे तयार केले. तेव्हाचा चौथराचा इतिहास अजरामर आहे. राजस्थानातील मानगड येथे दीड हजारांपेक्षा जास्त आदिवासी लढवय्यांना ब्रिटिशांनी गोळ्या झाडल्या. त्या मानगड शहीद स्मारकांचा इतिहास आहे. मात्र आम्हाला फक्त जालियनवालाहत्याकांड आठवतो व आठवायलाच पाहिजे....

परंतु आदिवासींच्या मोठ्या हत्याकांडाचा विसर पडतो. भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतीकारक तंट्या भिल, राघोजी भांगरे, राणा पुंजा भिल, राणी दुर्गावती, खाज्या नाईक, भीमा नायक असे हजारो आदिवासी वीर शहीद झाले. अशा ज्ञात- अज्ञात शहिदांचे या दिवशी स्मरण केलेच पाहिजे. कारण त्याशिवाय आजच्या युवा पिढीला आदिवासींच्या गौरवशाली इतिहासाचा शोध घेण्यास चालना मिळणार नाही किंबहुना दडलेला इतिहास शोधण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे....


*मशालीच्या प्रकाशवाटेने जाण्याचा संकल्प करू या*
२३ डिसेंबर १९९४ साली युनोने संपूर्ण जगातील आदिम जमातींना एकत्र आणण्याकरिता काही निवडक प्रतिनिधींची सर्वसाधारण सभा घेऊन त्यांच्या पारंपरिक जीवन पद्धती, निसर्ग आणि पर्यावरणाशी त्यांचे असलेले अतूट नाते, त्यांच्या बोलीभाषा, संस्कृतीतील वैविध्य, मानवाधिकार आणि मूलभूत गरजा पूर्ण होण्यातील अडचणी, जागतिकीकरणात त्यांच्या समोरील आव्हाने या

साऱ्या मुद्यांवर चर्चा होऊन युनोच्या ठराव क्रमांक ४६/२१४ प्रमाणे ९ ऑगस्ट हा दिवस १९९५ पासून 'जागतिक आदिवासी दिवस' म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले.

*सांस्कृतिक महत्त्व*
आदिवासीची जल, जमीन, जंगलाशी,
     सांस्कृतिक नाळ जुळली आहे. त्यांना अनुसूचित क्षेत्रात अनुसूचीबद्ध करून राष्ट्र विकास प्रवाहाच्या बाहेर ब्रिटिशानी ठेवले तसे भारतीय प्रशासनव्दारा ठेवून त्यांचे जल, जमीन, जंगलावरचे सर्व अधिकार नाकारले आहे. पर्यायाने आदिवासीच्या सांस्कृतिक अधिकाराला नकार दिला आहे. मूळनिवासीच्या संकल्पनेत आदिवासीच्या सांस्कृतिक मूल्याशी जुळलेल्या भूभागाला विशेष महत्व आहे. याच भागात ठेकेदार, प्रकल्प, इंडस्ट्रीज, माइन्स इ. उभारले जावून भारताच्या एकूण संपत्तीपैकी ८० टक्के संपती फक्त आदिवासी भागात असूनसुद्धा, त्यांना या संपतीपासून वंचित ठेवले जात आहे.

*आत्मसन्मान,*
आत्मचिंतन करण्यासाठी
    सर्वसामाज बांधव आहे त्याच ठिकाणी एकत्र येऊ लागले. आपली समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, आपले संपन्न मौखिक वाड्मय, आपल्या परंपरा, आपली निसर्गातील श्रद्धा आणि निसर्गातील प्रतिमा आणि प्रतीक रूपी अपार श्रद्धेय देवते, आपला अनुल्लेखित इतिहास जिथे आदिवासी तिथे धरण विकासाच्या नावाखाली त्यांचे मरण या ठसठसणाऱ्या वेदना जागतिकीकरणाच्या प्रवाहात आपण कुठे आहोत आदी समस्यांवर गंभीरपणे चर्चा करत असताना आरोग्य, शिक्षण, विकास, बेरोजगारी, व्यसनाधीनता, आदिवासींचे साहित्य, भाषा व बोली इत्यादी मुद्यांवरही आत्मचिंतन व्हावे याकरिता शासकीय प्रतिनिधी, विद्यार्थी, राजकीय नेतृत्व, सामान्य जनता आणि बुद्धीजीवी वर्ग या सान्यांनी आपसातील मतभेद विसरून एका व्यासपीठावर येऊन सर्वांगीण चर्चा करून समाज प्रबोधन करावे...
*लेखक योगेश मोगरे*
*आदिवासी एकता परिषद*
*( भिलवंश ग्रुप शहादा )*